शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

२०... गुन्हे

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

भानेगाव येथे तरुणाची आत्महत्या

भानेगाव येथे तरुणाची आत्महत्या
खापरखेडा : तरुणाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानेगाव येथे गुरुवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भानेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशीही आत्महत्येचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली.
बजरंग मोहन परसमोडे (२२, रा. भानेगाव, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. बजरंग हा गुरुवारी सकाळी त्याच्या खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत त्याच्या वडिलांना आढळून आला. सदर प्रकाराची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बजरंगला दोन मोठे भाऊ असून, दोघेही वेगळे राहायचे. बजरंग अविवाहित असल्याने तो वडिलांसोबत राहायचा. त्याला मागील काही दिवसांपासून रोजगार नसल्याने चिंतेत राहात असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. शिवाय, त्याला दारूचे व्यसनही जडले होते. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भागोजी चोरमुले, गणेश पाल, आशिष मुगले करीत आहे. (प्रतिनिधी)
***
वाटमारी करणाऱ्यास अटक
कळमेश्वर : महिलेचा पाठलाग करून तिच्या पर्समधील रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कळमेश्वर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वीरेंद्र रामदास बोकडे (३२, रा. थपडीपवनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी दामिनी सुरेश हरवडे (२६, रा. फेटरी) या त्यांची पुतणी शिल्पा बेलकर हिच्यासोबत कळमेश्वरातील बाजारातून बसस्थानकाकडे पायी येत होत्या. दरम्यान, आरोपी वीरेंद्रने त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या पर्समधील एक हजार रुपये काढून पळ काढला. हरवडे यांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.
***