अहमदनगर: नदी पात्रातील वाळू साठ्यांच्या विक्रीस पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखविला असून, जिल्ह्यातील १९४ साठ्यांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येत आहे़ त्यामुळे वाळू व्यापार्यांनाही आता ऑलानईन बोली लावावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ नदीपात्रातील वाळू साठ्यांचा डिसेंबरमध्ये लिलाव केले जातात़ जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध नदीपात्रातील २६६ वाळू साठ्यांतील वाळू विक्रीचा प्रस्ताव तयार केला होता़ मात्र पर्यावरण विभागाने १९४ वाळू साठे विक्रीस परवानगी दिली आहे़ वाळू साठे १७४ कोटी ८४ लाख ६८ हजार ३५८ रुपये किमतीचे आहे़ सदर वाळू साठ्यांच्या विक्रीची प्रक्रिया जिल्हा गौणखणिज विभागाने सुरू केली आहे़ साठे विक्रीसाठी दोन पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे़ ऑनलाईन निविदा व ऑनलाईन लिलावाव्दारे ही विक्री केली जाणार आहे़ निविदा दाखल करण्याची १३ जानेवारी अंतिम मुदत आहे़ तर येत्या १५ व १६ जानेवारी रोजी ऑनलाईन लिलाव केला जाणार आहे़ निविदा १६ रोजी उघडण्यात येणार असून, सर्वाधिक बोली लावणार्यांना वाळू साठ्यांची विक्री केली जाणार आहे़
१९४ वाळू साठ्यांचा ऑनलाईन लिलाव
By admin | Updated: December 31, 2014 18:56 IST