शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप व्हॅन-ट्रक अपघातात १८ मृत, १६ जखमी

By admin | Updated: December 6, 2015 02:06 IST

जयपूर : राजस्थानातील प्रतापगड जिल्‘ातील धोलापानी ठाणे विभागात शनिवारी पिकअप व्हॅन व ट्रक अपघातात ११ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १६ व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली असता हा अपघात झाला.

जयपूर : राजस्थानातील प्रतापगड जिल्ह्यातील धोलापानी ठाणे विभागात शनिवारी पिकअप व्हॅन व ट्रक अपघातात ११ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १६ व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली असता हा अपघात झाला.
धोलापानी ठाण्याचे पोलीस अधिकारी रतनलाल यांनी सांगितले की, पिकअप व्हॅन ट्रकवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात १२ व्यक्तींचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य सहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी १५ व्यक्तींना उदयपूर येथील तर एकाला प्रतापगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्ती छोटी सादडी येथे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस चौकशी करीत आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री साहायता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये व गंभीर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला २५ हजार रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)