शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

जि.प.घडविणार सरपंचांना पाटोद्याचा दौरा १७८ गावांना संधी : स्वच्छता विभागातर्फे निधीची तरतूद

By admin | Updated: March 30, 2016 22:21 IST

जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्‍यावर नेले जाणार आहे.

जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्‍यावर नेले जाणार आहे.
त्यासंबंधी विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी व इतर वरिष्ठांना जि.प.तर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. या दौर्‍यासाठी जि.प.तर्फे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून निधीची व्यवस्था केली जाणार आहे.
एकाच वेळी शक्य आहे तेवढ्या अधिक सरपंच व ग्रामसेवक यांना पाटोदा येथे पाठविले जाईल. या वृत्तास अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी दुजोरा दिला आहे.

साक्री पं.स.कडून करवून घेणार भूमीगत गटारी
सांडपाणी व्यवस्थापनासंबंधी प्रस्तावित गावांमध्ये भूमिगत गटारी बांधण्यासाठी साक्री ता.धुळे येथील पं.स.चे पदाधिकारी, अभियंता व काही ग्रा.पं.च्या सरपंचांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक गावात भूमिगत गटारी व शोषखड्ड्याचा कार्यक्रम घेतला जाईल. त्यासाठी प्लास्टिकचे मोठे पाईप वापरले जातील. साक्री तालुक्यात भूमिगत गटारी बांधकामाचा पॅटर्न निर्माण केला आहे. तेथील अधिकारी व काही सरपंचांनी नुकतेच जिल्हाभरातील १७८ ग्रा.पं.च्या सरपंचांना भूमिगत गटारी किंवा सांडपाणी व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शनही केले आहे.

असे आहे पाटोदा गाव
पाटोदा हे औरंगाबाद जिल्‘ातील साधारणत: पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाला निर्मल, आदर्श गाव असे सर्वच प्रमुख पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते दोन वेळेस गौरव झाला आहे. गावात प्रत्येक घराला रोज २० लीटर शुद्ध पाणी ५ पैसे दरात दिले जाते. सकाळी गरम पाणी अंघोळीसाठी सोडले जाते. गावात १०० मीटर अंतरावर कचरा कुंड्या व थुंकीपात्र, गुळण्या करण्यासाठी बेसीन आहेत. सर्व गल्ल्यांमध्ये पेव्हर असून, प्रत्येक घरात शौचालय आहे. धुणे धुण्यासाठी चार घाट बांधले आहेत. राज्याच्या तीन तत्कालीन अर्थमंत्र्यांनी या गावास निधी प्रदान केला आहे. मंत्रालयातील एक हजार कर्मचार्‍यांनी या गावास अभ्यासासंबंधी भेट दिली आहे.