शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दोन वर्षांत १५ हजार नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:24 IST

मागील दोन वर्षांत गुजरातमध्ये उपचारादरम्यान १५,००० नवजात बालकांचा मृत्यू झाल्यावरुन काँग्रेसने गुजरातमधील भाजप सरकारवर कडाडून हल्ला करीत मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नवी दिल्ली : मागील दोन वर्षांत गुजरातमध्ये उपचारादरम्यान १५,००० नवजात बालकांचा मृत्यू झाल्यावरुन काँग्रेसने गुजरातमधील भाजप सरकारवर कडाडून हल्ला करीत मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मंगळवारी विधानसभेत काँग्रेस आमदारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मान्य केले की, २०१८ आणि २०१९ राज्यभरात १५,०१३ नवजात बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पटेल यांच्याकडे आरोग्य खातेही आहे. गुजरातमधील सर्व जिल्ह्यांतील इस्पितळांतील नवजात शिशू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या या बालकांचा मृत्यू झाला.कोणी जाब विचारणार की नाही?बुधवारी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंबंधीच्या वृत्ताचा हवाला देत नवजात बालकांच्या मृत्यूस भाजप सरकारला जबाबदार धरले. १५,०१३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. दरदिवशी २० नवजात बालक मरण पावत आहेत. अहमदाबादेत सर्वाधिक ४,३२२ नवजात बालकांचा मृत्यू झाला. अमित शहा यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. या बालकांचा आक्रांत तरी ऐकायला येतो का? कोणी याबद्दल जाब विचारणार की नाही? टीव्ही मीडिया साहस दाखवील का? अशा प्रश्नांची टिष्ट्वटवरून सरबत्ती करीत सुरजेवाला यांनी भाजप सरकारला घेरत या गंभीर मुद्याकडे मीडियाचे लक्ष वेधले.>सर्वाधिक मृत्यू अहमदाबादेतसंसद भवन परिसरात काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहील यांनी सांगितले की, नवजात शिशू उपचार कक्षांसाठी काही नियम आहेत. संसर्ग पसरू नये म्हणून दोन आजारी नवजात बालकांत तीन मीटर अंतर असावे; परंतु आम्ही भेट दिली असताना बालकांना एकमेकांजवळ ठेवण्यात आल्याचे दिसले. पंतप्रधान आणि गृहमंत्री या मुद्यांवर संवेदनशील नाहीत. सर्वाधिक मृत्यू अहमदाबादेत झाले. त्यानंतर राजकोटचा क्रमांक लागतो.मुख्यमंत्री याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.