शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

१३... पारशिवनी... कापूस

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

(फोटो)

(फोटो)
कापूस मोजणीसाठी शेतकरी ताटकळत
आवक वाढली : संकलन केंद्रावर कापूस उत्पादकांची थट्टा
पारशिवनी : शासनाच्या उदासीन धोरणांमुळे भाव वाढण्याच्या आशेवर असलेल्या कापूस उत्पादकांच्या पदरी शेवटी निराशाच पडली. भाव वाढण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी कापूस संकलन केंद्रांवर आणणे सुरू केले आहे. त्यातच आवक वाढल्याने कापूस मोजण्यासाठी शेतकऱ्यांना संकलन केंद्रावर ताटकळत राहावे लागत आहे. मात्र, समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असले तरी तुलनेत भाव वाढले नाही. त्यातच खासगी व्यापारी कापूस खरेदीसंदर्भात कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव सीसीआयच्या (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. यासाठी शासनाने सीसीआयच्या माध्यमातून जिल्ह्यात नागपूर, हिंंगणा, काटोल-नरखेड, पारशिवनी, सावनेर, रामटेक, कळमेश्वर व उमरेड या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करून कापूस खरेदीला सुरुवात केली.
यंदा प्रतिकूल वातावरणामुळे शेतातील कापूस घरी यायला विलंब झाला. त्यामुळे कापूस बाजारातही उशिरा पोहोचला. सीसीआयने सुरुवातीला प्रति क्विंंटल ४ हजार ५०० रुपये भावाप्रमाणे केवळ १० दिवस कापसाची खरेदी केली. त्यानंतर भाव कोसळल्याने मध्यंतरी काही केंद्र बंदही करण्यात आले होते. नंतर ते पूर्ववत सुरू करण्यात आले. हल्ली बाजारात कापसाची आवक वाढली आहे.
पारशिवनी येथील कापूस संकलन केंद्र दी नरेंद्र जिनिंंग-प्रेसिंंगच्या आवारात सुरू करण्यात आले. तिथे २८ हजार ८६५ क्विंंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात शेतकऱ्यांना वेगवेगळा भाव दिला जातो. कापसाचा दर हा कापूस पणन महासंघाचे ग्रेडर ठरवित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कापसाची प्रत पाहून ४ हजार २०० रुपये, ३ हजार ९५०, ३ हजार ९१० आणि ३ हजार ८५१ रुपये प्रति क्विंंटलप्रमाणे कापूस खरेदी केला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी रोज १ हजार ते १ हजार २०० क्विंंटल कापसाची खरेदी केली जात असल्याचे संबंधितांनी सांगितले. (प्रतिनिधी)