शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१२वीच्या ‘टॉपर’ची होणार फेरपरीक्षा

By admin | Updated: June 3, 2016 02:47 IST

बिहार शालेय परीक्षा मंडळाने (बीएसईबी) गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थी या मानास पात्र आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची पुन्हा छोटी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.

पाटणा : बिहारमध्ये १२वी कला शाखेच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलीने कॅमेऱ्यासमोर राज्यशास्त्र हा विषय पाककलेशी संबंधित असल्याचे सांगितले, तर तिच्याच कॉलेजमधील आणि विज्ञान शाखेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला पाणी व एचटूओ यांचा संबंध काय, यांसारख्या प्राथमिक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. या पार्श्वभूमीवर बिहार शालेय परीक्षा मंडळाने (बीएसईबी) गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थी या मानास पात्र आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची पुन्हा छोटी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. बिहारमध्ये १२ वीच्या तिन्ही शाखांचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाल्यानंतर स्थानिक वाहिन्यांनी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात त्यांच्या गुणवत्तेचा भंडाफोड झाला. बीएसईबीने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतील सर्व १४ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना छोटेखानी फेरपरीक्षेसाठी ३ जून रोजी पाचारण केले आहे. कला शाखेतील विद्यार्थिनी रुबी रॉय हिने पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र) विषयाचा ‘प्रोडिगल सायन्स’ असा उच्चार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंडळाने तातडीने गुणवत्ताधारकांच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतला. सोबतच या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले. रुबीला राज्यशास्त्रात १००पैकी ९१ गुण मिळाले असून, एकूण ५०० गुणांच्या परीक्षेत तिने ४४४ गुण संपादित केले आहेत. मात्र, परीक्षा एकूण किती गुणांची होती असे विचारले तेव्हा तिने उत्तर दिले ६०० गुणांची. विशेष म्हणजे रुबी टी.व्ही. चॅनलशी बोलत असताना तिचा एक नातेवाईक तिला पाठीमागून प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. विज्ञान शाखेचा टॉपर सौरव श्रेष्ठा यालाही मूलभूत प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्याने अ‍ॅल्युमिनियम हा सक्रिय धातू असल्याचे सांगितले. एवढेच नाहीतर, सोडियम आणि इलेक्ट्रॉन्सचीही त्याला माहिती नव्हती. बीएसईबीचे चेअरमन लालकेश्वर प्रसाद सिंग म्हणाले की, गुणवत्ता यादीत आलेल्या सर्वांची एक छोटी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासोबत आपण प्रत्येकाची मुलाखत घेणार आहोत. यात विद्यार्थी अपयशी ठरला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.बिहारमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी १२वीची परीक्षा दिली होती. त्यातील १४ जण गुणवत्ता यादीत आले असून, गुणवत्ता यादीतील बहुतांश विद्यार्थी पाटणा शहरापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या हाजीपूर येथील व्ही.एन. रॉय कॉलेजचे आहेत.गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना साध्या प्रश्नांची उत्तरे न येणे हा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणात एकाच्या नावावर दुसऱ्याने परीक्षा दिली असेल किंवा परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका बदलल्या असाव्यात, असा संशय असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी सांगितले.