शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

मोदींमुळे 'त्या' 12 वर्षाच्या मुलाला मिळणार जीवदान

By admin | Updated: January 7, 2017 16:30 IST

पार्थला मेंदूच्या या दुर्मिळ विकारातून बरे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सर्व बचत खर्च केली, संपत्ती आणि पत्नीचे दागिने विकले.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मदतीमुळे गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील 12 वर्षाच्या पार्थला नवीन आयुष्य मिळू शकते. मेंदूच्या दुर्मिळ विकाराने आजारी असलेल्या पार्थच्या उपचाराची सर्व जबाबदारी पंतप्रधान कार्यालयाने स्वीकारली आहे. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पार्थच्या आई-वडिलांनी  अपेक्षा सोडून दिल्या होत्या. 
 
पार्थला मेंदूच्या या दुर्मिळ विकारातून बरे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सर्व बचत खर्च केली, संपत्ती आणि पत्नीचे दागिने विकले. पण ऐवढे करुनही पार्थच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही. अखेर उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी अपेक्षा सोडून दिली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहीले. 
 
तिथूनही त्यांना फार अपेक्षा नव्हती. अचानक एक दिवस त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देणारे पत्र आले.  दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मुलावर मोफत उपचार करण्यात येतील असे त्या पत्रात लिहीले होते. पार्थची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर एम्स रुग्णालयात स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. पंतप्रधानांनी आम्हाला आर्थिक मदतच नाही तर, नैतिक पाठबळही दिले असे पार्थच्या वडिलांनी सांगितले.