शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाच्या एका ताटाची किंमत 12 हजार रुपये! आपची शाही मेजवानी?

By admin | Updated: April 8, 2017 20:07 IST

इतर राजकीय पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीवर टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि,  8 - इतर राजकीय पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीवर टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या वाढदिवसाला देण्यात आलेल्या मेजवानीत जेवणाच्या ताटासाठी प्रत्येकी सुमारे 12 हजार रुपये मोजण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या एमसीडी निवडणुकीपूर्वी आपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी केजरीवाल यांच्या शाही जेवणावळीचे बील ट्विटरवर शेअर केले आहे. 12 फेब्रुवारी 2016 रोजी आयोजित या मेजवानीमध्ये आपचे आमदार, मंत्री आणि समर्थक सहभागी झाले होते. ट्विटरवर टाकलेल्या बिलामध्ये  जेवणाच्या एका ताटाची किंमत 12 हजार  20 रुपये एवढी दर्शवण्याता आली आहे. अशा एकूण 30 ताटांचे 3 लाख 60 हजार 600 रुपयांचे बिल देण्यात आले तसेच यावरील 36 हजार रुपयांचा सेवाकर जोडल्यास एकूण 4 लाख रुपये मेजवानीवर खर्च झाले आहेत.  
मात्रा आपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हे बिल पाठवणाऱ्याविरोधात चौकशी सुरू केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही हे आरोप फेटाळून लावताना एमसीडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बिनबुडाचे आरोप पक्षावर केले जात असल्याचे म्हटले आहे.