शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

रात्री १२ वाजताही मदतीला येईन - मोदींचे मुस्लिम नेत्यांना आश्वासन

By admin | Updated: June 4, 2015 11:09 IST

रात्री १२ वाजताही तुम्हाला माझी मदत लागली तर मी तुमच्यासाठी हजर असेन असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - रात्री १२ वाजताही तुम्हाला माझी मदत लागली तर मी तुमच्यासाठी हजर असेन असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले. मंगळवारी मोदींनी मुस्लिम बांधवांच्या ३० सदस्य असलेल्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वीही उपस्थित होते. 
'आपले सरकार देशातील १२५ कोटी जनतेचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत
तुम्हाला रात्री १२ वाजता जरी माझी मदत लागली तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन' असे आश्वासनही त्यांनी दिले. 'मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण थांबवायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुस्लिमांच्या मतावरून आजपर्यंत केलेल्या राजकारणामुळे देशाला मोठा फटका बसला आहे. मात्र फुटीच्या राजकारणावर आपला विश्वास नसून धार्मिक भेदभावाची भाषा मी कधी करणार नाही', असेही ते म्हणाले. माझ्या कामावरून माझे मूल्यांकन करा, माझे विरोधक माझ्यावर काय आरोप करतात यावरून माझी पारख करू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रोजगार व विकास हाच सर्व समाजाच्या समस्यांवर उपाय असून त्यादृष्टीने आपलं सरकार काम करत आहे, असेही मोदींनी या शिष्टमंडळाला सांगितले. सरकारकडून घेण्यात येणारे निर्णय व उपाययोजनांची माहितीही मोदींनी त्यांना दिली. 
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मोदींनी अल्पसंख्यांकांविरोधातील विधाने खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा संघ परिवाराला दिला होता. आमचे सरकार कोणत्याही समुदायाविरुद्ध भेदभाव वा हिंसाचाराला मुळीच थारा देणार नाही. प्रत्येक नागरिकाला देशाच्या घटनेने धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.