शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आज अकरावी आंतरराज्य परिषद

By admin | Updated: July 16, 2016 02:47 IST

फ्रान्समधील नाईस येथे शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे दाट सावट शनिवारपासून येथे होणाऱ्या ११व्या आंतराज्य परिषदेवर पडले आहे

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीफ्रान्समधील नाईस येथे शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे दाट सावट शनिवारपासून येथे होणाऱ्या ११व्या आंतराज्य परिषदेवर पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, जवळपास ३१ मुख्यमंत्री या वेळी उपस्थित राहतील. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी आधीच अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेवर ठेवला आहे. परंतु परिषदेचा मुख्य झोत हा आक्रमकपणे आधार कार्डचा वापर थेट लाभार्थींना अनुदान, फायदे आणि सेवा देण्यासाठी करावा यावर आहे. आधार कार्डच्या माध्यमातून केंद्र सरकार अनुदान देत आहे; परंतु या कार्डचा राज्यांकडून अपेक्षित वापर होत नसून केंद्र सरकारच्या काळजीचा हा विषय आहे. परिषदेत केंद्र व राज्य संबंधांवरील पंछी आयोगाच्या शिफारशींवरही विचार होईल. तथापि, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांचा भर आहे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील लोकशाही मार्गांनी निवडून आलेली सरकारे अस्थिर करण्याचा राष्ट्रीय एनडीए सरकारने कसा प्रयत्न केला हे सांगण्यावर. अरविंद केजरीवाल व नितीश कुमार काय बोलतात हे बघणे रंजक असेल. उत्तराखंडचे हरीश रावत आणि अरुणाचल प्रदेशचे नबाम तुकी यांची सरकारे भाजपाने खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे दोघेही मोदी यांच्या समोर येतील.अर्थात भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री या हल्ल्यांना जशास तसे उत्तर देतील. परंतु मोदी यांनी या परिषदेपासून राजकीय विषय दूर ठेवून आधीच कळविण्यात आलेल्या चार कलमी कार्यक्रमावरच लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारांचे सशक्तीकरण करण्यावर भर असलेल्या सहकारी संघवादाचे आश्वासन मोदी यांनी दिले होते तो शब्द पाळण्याचा त्यांचा निर्धार आहे. आंतरराज्य परिषदेचे सचिवालय गृहमंत्रालयाच्या हाताखाली असून, त्याने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली याआधीच पाच विभागीय परिषदांचे आयोजन केले होते.