ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १४ - राजस्थानमध्ये जयपूरजवळ एका गॅस टँकरने पेट घेतल्याने झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून १२ जण ठार झाले आहेत. बीलपूर गावापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या महामार्गावर शनिवारी रात्री एका गॅसच्या टॅंकरने पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यावेळी महार्गावरून इतर वाहनेही जात होती. त्यातील काही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला तर १२ जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, मात्र आता पूर्ववत झाली आहे.