शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
2
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
3
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
4
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
5
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
6
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
7
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती
8
कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
9
Supriya Sule : "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
10
अमेरिकेतून आले 'निराशेचे' संकेत! सेन्सेक्स-निफ्टी धडाम, 'या' १० शेअर्सचं सर्वाधिक नुकसान
11
धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!
12
दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका
13
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
14
रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार टीव्ही अभिनेता, 'सुख म्हणजे...' मालिकेत केलंय काम
15
Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
16
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
17
धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?
18
Jyoti Malhotra : राजस्थानमध्ये कुठे आणि कोणाच्या घरी थांबली होती ज्योती मल्होत्रा? व्हिडीओही बनवला अन्... 
19
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा
20
नटीनं मारली मिठी...! मुंबई इंडियन्सने IPL प्लेऑफ्समध्ये प्रवेश करताच सिद्धार्थचं वानखेडेवर सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

10 आयटी, दूरसंचार कंपन्या करणार नोकर कपात!

By admin | Updated: May 11, 2017 03:36 IST

आयटी आणि दूरसंचार क्षेत्रातील बड्या १0 कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करणार आहेत. २00८ ते १0 या काळातील

नवी दिल्ली : आयटी आणि दूरसंचार क्षेत्रातील बड्या १0 कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करणार आहेत. २00८ ते १0 या काळातील मंदीनंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात नोकर कपात केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार, मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील व्यावसायिकांना नोकर कपातीचा पहिला फटका बसणार आहे. त्यानंतर पुढच्या काही महिन्यांत कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची कुऱ्हाड कोसळेल.कॉग्निझंट-कॉग्निझंट किमान ६ हजार कर्मचारी काढणार आहे. एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत हा आकडा २.३ टक्के आहे. स्वयंचलितीकरणामुळे निरर्थक झालेली पदे रद्दच केली जाणार आहेत. याशिवाय कंपनीने स्वेच्छा पदत्याग योजनाही आणली आहे. कॅपजेमिनी-फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनी ९ हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठविणार आहे. एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्के आहे. कॅपजेमिनीने २0१५ मध्ये अधिग्रहण केलेल्या आयगेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीने मुंबईतील ३५ उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष, संचालक आणि वरिष्ठ संचालकांना राजीनामे देण्यास सांगितले होते.इन्फोसिस-इन्फोसिस आपल्या १ हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहे. लेव्हल-६ आणि त्यावरील गटातील हे कर्मचारी आहेत. समूह प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ आर्किटेक्ट आणि त्यावरील पदांचा यात समावेश आहे.विप्रो : सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी विप्रो अतिरिक्त असलेल्या व्यवस्थापक आणि कार्यकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना घरी पाठविणार आहे. सीईओ आबिदाली निकुचवाला यांच्या धोरणानुसार कंपनी अधिक सुटसुटीत आणि विकेंद्रित केली जाणार आहे.एअरसेल : दूरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरसेल १0 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. ८ हजार पैकी ७00 कर्मचाऱ्यांना कंपनी काढणार आहे.स्नॅपडील : ई-टेलर कंपनी स्नॅपडील तब्बल ३0 टक्के कर्मचारी कमी करणार आहे. सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल.टाटा टेलिसर्व्हिसेस -सुमारे ५00 ते ६00 जणांना कामावरून कमी करणार आहे. विक्री आणि अन्य कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर ही कुऱ्हाड कोसळणार आहे. राहिलेल्या सेवेसाठी वार्षिक १ महिन्याचे वेतन देऊन त्यांना काढले जाणार आहे.लिएको-चिनी कंपनी ‘लीएको’ने भारतातील ८५ टक्के कर्मचारी वर्ग काढून टाकला आहे. दोन सर्वोच्च अधिकारीही काढले आहेत. कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.क्राफ्टस्विला-अ‍ॅथनिक आॅनलाइन रिटेलर क्राफ्टस्विला कंपनीने अलीकडेच १00 लोकांना कामावरून काढले आहे. आणखी लोकांना काढले जाणार आहे.येपमी-फॅशन क्षेत्रातील स्टार्ट अप येपमीने अलीकडच्या काही आठवड्यांत अनेक कर्मचाऱ्यांना ले-आॅफच्या पिंक स्लिप दिल्या आहेत.