शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

भारताला हा द र वि णा रे 10 मोठे भूकंप

By admin | Updated: April 27, 2015 23:26 IST

२६ डिसेंबर २00४ रोजी सकाळी ८.५0 वा. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ खोल समुद्रात हा भूकंप झाला. त्याची रिश्टर स्केलवरील तीव्रता ९.१ ते ९.३ इतकी होती.

हिंदी महासागरातील भूकंप : २00४२६ डिसेंबर २00४ रोजी सकाळी ८.५0 वा. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ खोल समुद्रात हा भूकंप झाला. त्याची रिश्टर स्केलवरील तीव्रता ९.१ ते ९.३ इतकी होती. भूकंपाने त्सुनामीचे तांडव निर्माण केले. भारतासह इंडोनेशिया, थायलंड, मालदीव आणि सोमालिया या देशांत मिळून २,८३,१0६ लोक यात ठार झाले. तसेच भयानक विध्वंस झाला. चेन्नईतील मरिना बीचवर त्सुनामीने विनाश घडवून आणला. काश्मीर भूकंप : २00५८ आॅक्टोबर २00५ रोजी सकाळी ८.५0 वा. झालेल्या या भूकंपाचे केंद्र पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादजवळ होते. त्याची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी होती. १,३0,000 लोक त्यात ठार झाले. भारतातील काश्मीरमध्ये जीवित हानीचे प्रमाण पाकच्या तुलनेत कमी होते. चीन, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान येथेही नुकसान झाले.बिहारचा भूकंप : १९३४१५ जानेवारी १९३४ रोजी दुपारी २.१३ वा. झालेल्या या भूकंपाचे केंद्र हिमालयातील एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेला होते. त्याची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी होती. भारत आणि नेपाळ अशा दोन्ही देशांत त्याने विध्वंस घडविला. ३0 हजार लोक त्यात मरण पावले. भूकंपग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी महात्मा गांधी तेव्हा बिहारात गेले होते. कच्छचा (गुजरात) भूकंप : २00१२६ जानेवारी २00१ रोजी सकाळी ८.५0 वा. हा भूकंप घडला होता. भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना गुजरातवर ही आपत्ती कोसळली. कच्छमध्ये त्याचे केंद्र होते. २0 हजार लोक त्यात ठार झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. जनजीवन पूर्वपदावर यायला ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला. कांग्रा भूकंप : १९0५४ एप्रिल १९0५ रोजी सकाळी ६.१0 वा. आलेल्या या भूकंपात हिमाचल प्रदेशातील कांग्रा भाग उद्ध्वस्त झाला. याचे केंद्र हिमालयात होते. रिश्टर स्केलवर ७.८ इतकी त्याची तीव्रता होती. २0 हजार लोकांचा बळी घेणाऱ्या या भूकंपात १ लाखापेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली.लातूरचा भूकंप : १९९३३0 सप्टेंबर १९९३ रोजी मध्यरात्री हा भूकंप झाला. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ त्याचे केंद्र होते. त्याची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. तीव्रता तुलनेने कमी असली तरी नुकसान मात्र खूपच जास्त झाले. ९,७४८ लोक ठार झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात ही हानी झाली. गणेश उत्सवाच्या समाप्तीच्या दिवशीच हा भूकंप झाला होता. आसामचा भूकंप : १९५0१५ आॅगस्ट १९५0 रोजी म्हणजेच ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा भूकंप झाला. सायंकाळी ७.३९ वा. संपूर्ण आसाम आणि तिबेट या भूकंपाने हादरला. याचे केंद्र तिबेटमधील रिमाजवळ होते. त्याची तीव्रता ८.६ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १,५२६ लोक ठार झाले. भूकंपानंतर लगेच आलेल्या पावसाने आसामात पूरस्थितीही निर्माण केली होती.आसामचा भूकंप : १८९७१२ जून १८९७ रोजी सायंकाळी ५.११ वा. हा भूकंप आला. त्याकाळी तंत्रज्ञान एवढे प्रगत नसल्यामुळे त्याचे केंद्र अज्ञात आहे. त्याची तीव्रता ८.१ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १,५00 लोक ठार झाले. भारतातील आसामसह तिबेट आणि तत्कालीन ब्रह्मदेश (म्यानमार) या देशांना भूकंपाचा फटका बसला.उत्तराखंडचा भूकंप : १९९१२0 आॅक्टोबर १९९१ रोजी आलेल्या या भूकंपाचे केंद्र उत्तराखंडमधील गढवालमध्ये होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ इतकी होती. त्यात १ हजार लोक ठार झाले. १३00 गावांतील ४२ हजार घरे त्यात उद्ध्वस्त झाली. संपूर्ण उत्तराखंडमध्ये त्यामुळे विनाश झाला.कोयनानगर भूकंप : १९६७महाराष्ट्रातील कोयनेच्या खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १८0 लोक ठार झाले. २५ कि.मी.च्या पट्ट्यात भूकंपाने विनाश घडवून आणला होता. कोयना खोरे महाराष्ट्रातील सर्वाधिक भूकंपप्रवण असून तेथे सातत्याने भूकंप होत असतात. येथील सर्वांत ताजा भूकंप १४ एप्रिल २0१४ रोजी झाला होता.