शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त वनक्षेत्रपालाकडे १ कोटीची बेहिशेबी मालमत्ता

By admin | Updated: May 7, 2014 00:10 IST

अटक : अँटीकरप्शन ब्युरोकडून झाडाझडती

औरंगाबाद : वन विभागातील आपल्या ३१ वर्षांच्या सेवा काळामध्ये श्रीधर तुपे यांनी १ कोटी ६ लाख २३ हजार ८०५ रुपयांंची अपसंपदा कमावली असल्याचे आज मंगळवारी निष्पन्न झाले. पहाटेच त्यांच्या सातारा परिसरातील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली आहे. कोळघर, ता. औरंगाबाद येथील रहिवासी श्रीधर भिवाजी तुपे हे सन २००८ मध्ये वनक्षेत्रपाल पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी वन विभागात १९७७ सालापासून नोकरी केली. सुरुवातीला ते वनपाल म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे रुजू झाले होते. त्यांनी कायदेशीर मार्गाने मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा कोट्यवधी रुपयांची अपसंपदा कमावल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ४ पोलीस उपअधीक्षक, ४ निरीक्षक व कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा सातारा परिसरातील त्यांच्या निवासस्थानावर धडकला. त्यांनी निवासस्थानाला घेरल्यानंतर लगेच आत जाऊन सर्व मालमत्तांची कागदपत्रे ताब्यात घेतली. तब्बल ७ तास ही तपासणी सुरू होती. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पोलीस आपल्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी श्रीधर तुपे यांना अटक केली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार कोळघर येथे श्रीधर तुपे यांच्या नावे ६ एकर १९ गुंठे शेती, पत्नी पद्माबाई तुपे यांच्या नावे १२ एकर ३५ गुंठे, मुलगा शरद तुपे यांच्या नावे ८ एकर ११ गुंठे, मुलगी जयश्री हिच्या नावे ६ एकर २० गुंठे, सुजाता हिच्या नावे ४ एकर ७ गुंठे, सुनीता हिच्या नावे ५ एकर ३७ गुंठे व मीना हिच्या नावे ५ एकर २० गुंठे शेती खरेदी करण्यात आलेली आहे. यातील काही शेतीमध्ये १२ लाख रुपये खर्चून पाईपलाईन टाकलेली आहे, तर काही ठिकाणी १० लाख रुपये खर्च करून शेततळे व ठिबक सिंचन केलेले आहे. कोळघर येथे तुपे यांचे १२ लाख रुपयांचे घर, पिंप्रीराजा येथे मुलगा शरद यासाठी २४ लाख रुपयांचे दुमजली हॉस्पिटल उभारलेले आहे. सातारा परिसरात ३३ लाख रुपयांचे घर व ठाणे जिल्ह्यात ४ लाख १० हजार रुपयांचा फ्लॅट खरेदी केलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या नावे औरंगाबाद व ठाणे येथे एकूण १४ बँक खाती आहेत. त्यांनी स्कॉर्पिओ, टाटा सुमो, ट्रॅक्टर, बुलेट मोटारसायकल अशी वाहनेही खरेदी केलेली आहेत. या प्रकरणात श्रीधर तुपे यांच्यासह अपसंपदेत सहभागी पत्नी पद्माबाई, मुलगा शरद, मुली सुनीता, मीना, जयश्री, सुजाता यांच्या विरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई यशस्वी करण्यासाठी अँटीकरप्शन ब्युरोचे अधीक्षक सं. दे. बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक भा. ब. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुरेश वानखेडे, रामनाथ चोपडे, प्रताप शिकारे, साईनाथ ठोंबरे, प्रवीण मोरे, जालन्याचे उपअधीक्षक एच. व्ही. गिरमे, निरीक्षक एस. ए. एस. सय्यद, शामसुंदर कौठाळे, किशोर पवार, ए. व्ही. रायकर, नीलेश देसले, श्यामसुंदर टाक यांनी परिश्रम घेतले.