शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक; दुपारनंतर मतदारांच्या रांगा

By admin | Updated: February 21, 2017 15:46 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुरू असलेल्या मतदानासाठी दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 21 - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुरू असलेल्या मतदानासाठी दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.  दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३४.३३ टक्के  मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक मतदान पेठ तालुक्यात ५२ टक्के झाले असून तर सर्वात कमी मतदान दिंडोरी तालुक्यात २८ टक्के झाले. काही ठिकाणी दुपारच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

दिंडोरी तालुक्यातील वणीनजिक भातोडे गावात इव्हीएम मशिनमधील तांत्रिक अडचणीने अनेकांना खोळंबून राहावे लागले. त्यामुळे मतदारांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. मालेगाव येथे दुपारी १.३० वाजेपर्यंत केवळ २८.८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. आंतरराष्ट्रीय धावपटू तथा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत-तुंगार हिने आपल्या कुटूंबासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.  पेठ तालुक्यात सकाळपासून सर्वच केंद्रावर मतदारांनी मोठया प्रमाणावर गर्दी केल्याने मतदान केंद्राबाहेर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.

तर एका मतदान केंद्राला आजूबाजूचे गाव पाडे जोडलेली असल्याने अनेक मतदारांना दोन चार किमी पायपीट कारीत मतदान करण्यासाठी यावे लागत होते. पेठ तालुका हा दर्याखोरयांनी वेढलेला असलेल्याने प्रशासनाला मतदान केंद्राशी संपर्क साधतांना चांगलीच कसरत करावी लागली. बहुतांश गावांना नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने क्षेत्रिय आधिकार्यांना दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी उपलब्ध करून घेण्यासाठी कसरत करावी लागली.  

पेठ तालुक्यात एकूण ७३०२५ मतदार असून यामध्ये बहुतांश मतदार रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याने अशा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. तर सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी स्थलांतरीत मतदार राजाचा शोध घेतल्याचे दिसून येत होते.