शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक रोडला युवकावर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:17 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालधक्का रोड, रमाबाई आंबेडकरनगर येथील युवक प्रतीक किशोर गांगुर्डे (२१) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालधक्का रोड, रमाबाई आंबेडकरनगर येथील युवक प्रतीक किशोर गांगुर्डे (२१) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तो रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गौतम छात्रालय येथे उभा असताना डेविड गायकवाड यांच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून किरण बुथवेल गायकवाड (२१, रा. रमाबाई आंबेडकरनगर, गुलाबवाडी, देवळाली गाव), श्याम गोविंद कसबे (२१), रोहित दाविन पाटोळे (१९) व डेविड गायकवाड यांनी प्रतीकसोबत वाद घालून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी किरण गायकवाड याने प्रतीकच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच हातावर व पायावर उलटा कोयता मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चौथा संशयित डेविड गायकवाड अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात नाशिक रोड परिसरामध्ये मारामारीच्या घटनेत कोयते वापरण्याचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज या भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.