शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोड येथे युवकाचा निर्घृण खून

By admin | Updated: March 9, 2017 01:45 IST

नाशिकरोड : जेलरोड लोखंडे मळा येथील संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) या युवकाचा पंचक सायट्रिक कंपनी मागील मोकळ्या मैदानात डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली.

नाशिकरोड : जेलरोड लोखंडे मळा येथील संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) या युवकाचा पंचक सायट्रिक कंपनी मागील मोकळ्या मैदानात डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. मयत इसमाची ओळख पटली असून तो जेलरोड लोखंडे मळा येथील हनुमंतानगर येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. आई-वडिलांसह राहणारा संतोष घरात भांडण करून बाहेर निघून गेला होता. बुधवारी सकाळी त्याचा खून झाल्याची बाब उघडकीस आली. संतोष ऊर्फ पप्पू पाटील याच्या डोक्यात सीमेंट कॉँक्रीटचा दगड घालून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पंचक सायट्रिक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत निंबाजी बाबा मंदिराजवळ बुधवारी सकाळी आढळून आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या डोक्यात सीमेंट कॉँक्रीटचा दगड घातल्याने त्यांचा चेहरा एका बाजूने छिन्नविछिन्न झालेला होता. त्यामुळे प्रारंभी मयताची ओळख पटविणे पोलिसांना अवघड झाले होते. पोलिसांनी काही मद्य विक्रेत्यांची चौकशी केल्यानंतर त्याचा घरचा पत्ता मिळाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याचा अज्ञात इसमांनी गळा आवळून अज्ञात ठिकाणी खून केला असावा आणि त्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह दुचाकी अथवा इतर वाहनाने सायट्रिक कंपनीमागे आणून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या डोक्यात सीमेंट कॉँक्रीटचा दगड घातल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले असता त्याने राजराजेश्वरी पुढील बालाजीनगरपर्यंत मार्ग काढला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मयत संतोषची बहीण मनीषा विनायक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (वय ३८) या युवकाला दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी मुलीसह अडीच वर्षापूर्वी माहेरी निघून गेली आहे. तर त्याचा लहान भाऊ राजू यादव पाटील (वय ३०) हा सहा महिन्यांपूर्वीच कुठेतरी निघून गेला आहे. संतोष पाटील याची बहीण त्याच्या घरापासून जवळच राहते. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास संतोष याने वडिलांशी वाद घालून धक्काबुक्की केली होती.यावेळी आई भांडण सोडविण्यास आली असता तिलादेखील संतोषने मारहाण केली. त्यानंतर तो आई-वडिलांकडून १०० रुपये घेऊन घरातून बाहेर निघून गेला. कुठलाही कामधंदा करत नसलेला संतोष दारूच्या व्यसनामुळे आई-वडिलांना सतत मारहाण करून सतत पैसे मागायचा. (प्रतिनिधी)