येवला : वर्षानुवर्षे थकीत असलेली येवला पालिकेची थकबाकी माफ करावी, विकासकामांची लोकवर्गणीची कवाडं बंद करावी यांसह पालिकेच्या काही मागण्यांसाठी, येवला नगराध्यक्ष नीलेश पटेल यांनी आमदार विनायक निम्हण यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शिष्टाई केल्याने येवल्याच्या विविध प्रश्नांवर वरिष्ठ सल्लागारांची बैठक लावून राज्यातील नगरपरिषदांसंदर्भात धोरणात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे येवला पालिकेचे नगराध्यक्ष नीलेश पटेल यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.भुजबळ यांनी नगराध्यक्ष म्हणून पालिकेचे काम करण्याची संधी दिली, यानंतर येवल्याचा विकास करण्याचे प्रभावी धोरण पालिकेत राबविल्याचे, पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. विविध योजनांसाठी नगरपरिषदांना लोकवर्गणी भरावी लागते ती माफ करावी, नगरपरिषद कर्मचार्यांना वेतन व भत्यापोटी १०० टक्के शासकीय अनुदान मिळावे. पाणीपीची दर आकारणी कमी करावी. पथदीप व पाणीपुरवठ्यासाठी अल्प दराने पालिकेला शासनाने वीज द्यावी. यामुळे शहरात जनतेच्या अपेक्षेप्रमाणे सेवा व सुविधा पुरविता येतील. याबाबत आमदार निम्हण यांच्या मध्यस्थीने नीलेश पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानी मागण्यांचे गार्हाणे टाकून चर्चा केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षांना, विकासकामांबाबत धन्यवाद देऊन प्रशंसा केली व मागण्यांसंदर्भात राज्यभरातील नगरपरिषदांबाबत प्रश्नांवर तोडगा काढण्याकामी वरिष्ठ सल्लागार मंडळाची बैठक लवकरच आयोजित करून या प्रश्नांवर तोडगा काढून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले. (वार्ताहर)
येवला विविध प्रश्नी नगराध्यक्षांचे साकडे मुख्यमंत्र्यांचे तोडगा काढण्याचे आश्वासन
By admin | Updated: May 14, 2014 00:34 IST