शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शेतीची मशागत संथच

By admin | Updated: May 19, 2017 00:41 IST

बळीराजा धजावेना : शेतमालाला भाव मिळत नसल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कधी पावसाची अनिश्चितता, तर पाऊस पडल्यानंतर शेतमालाला भाव मिळत नाही. कधी बेमोसमी, तर कधी गारपीट अशा एक ना अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून शेती उत्पादनपासून मिळणारे सरासरी उत्पन्न खालावल्याने हाती पैसाच उरत नाही. अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी पुन्हा सोसायट्या, सावकारांकडे पदर पसरावा लागत आहे. या प्रयत्नालाही फारसे यश मिळत नसल्याने शेत मशागतीचा वेग संथ झाल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणाऱ्या भावामुळे शेतकरी पिचला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काडीचीही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण मात्र वाढले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच झाल्याचे चित्र आहे. आधी दुष्काळ, त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे सरासरी उत्पादन घसरले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. पावसाळा जवळ आला असतानाही शेतात शेतकऱ्यांची वर्दळ फारशी दिसून येत नाही. उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतजमीन तापावी यासाठी शेतकरी एप्रिल-मे मध्येच नांगरणीच्या कामांनी शेतीच्या मशागतीला सुरवात करतो. पण यंदा मे उलटून चालला तरी शेतात बैलांच्या गळ्यातील घुंगरु ऐकू येईनासे झाले आहे, तर ट्रॅक्टरचाही आवाज मंदावल्याचे चित्र आहे.