शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मांजरपाडाचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST

भुजबळ यांनी पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव कालव्यावरील येवला तालुक्यातील अनकुटे शिवारात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगच्या कामाची पाहणी केली. यावेळी ...

भुजबळ यांनी पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव कालव्यावरील येवला तालुक्यातील अनकुटे शिवारात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगच्या कामाची पाहणी केली. यावेळी भुजबळ यांनी सांगितले, मांजरपाडा-देवसाने प्रकल्पाचे असलेले आव्हानात्मक काम लवकरच पूर्ण होत आहे. सातत्याने पाठपुरावा करून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकल्पातील रेल्वे क्रॉसिंगचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होते. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून यासाठी परवानगी मिळविण्यात आली. या क्रॉसिंगचे काम सुरू असून क्रॉसिंगसह राहिलेली किरकोळ कामे या महिनाभरात पूर्ण होतील. त्यामुळे यंदाच्या वर्षी या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्याने यंदाच्या वर्षी पूर्ण क्षमतेने पाणी येवल्याच्या दिशेने येणार आहे. प्रकल्प नवीन असल्याने पहिल्या वर्षी अडचणी येतील. मात्र, त्या सोडविल्या जातील, असेही भुजबळ यांनी आश्वस्त केले.

इन्फो

लवकरच जलपूजन

लवकरच येवल्याच्या दिशेने पाणी आल्यानंतर पुन्हा एकदा या कामाची आपण पाहणी करून जलपूजन करू, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, अरुण थोरात, मोहन शेलार, दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, ज्ञानेश्वर शेवाळे, साहेबराव आहेर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो - १५ येवला भुजबळ

येवला तालुक्यातील अनकुटे शिवारात रेल्वे क्रॉसिंग कामाची पाहणी करताना पालकमंत्री छगन भुजबळ.

150721\15nsk_36_15072021_13.jpg

फोटो - १५येवला भुजबळ  येवला तालुक्यातील अनकुटे शिवारात रेल्वे क्रॉसिंग कामाची पाहणी करताना पालकमंत्री छगन भुजबळ.