शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जादा दराने गहू बियाणे प्रकरणी लेखी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:25 IST

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असताना शेतीसह इतर छोट्या-मोठ्या उद्योगांना या गोष्टीचा मोठा फाटका ...

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असताना शेतीसह इतर छोट्या-मोठ्या उद्योगांना या गोष्टीचा मोठा फाटका बसून सर्व घटकांचा आर्थिक कणा मोडलेला असतानाच अशातच मागील काळात कांद्याच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई त्यात आता अजित १०२ गव्हाच्या बियाणासाठी शेतकऱ्यांना प्रिंट भावापेक्षा जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सरेआम लूट केली जात असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथील शेतकरी दर्शन केंगे यांनी या प्रकाराला वाचा फोडून निफाड तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांना लेखी निवेदन दिले, यावेळी दिलेल्या निवेदनात सदर बियाणांची कृत्रिम टंचाई व अतिरिक्त भाववाढ ही थांबवावी तसेच प्रशासनाचे व शासनाचे धोरण यांच्यावर कृषी विभागाचा खते व बियाण्यांच्या वितरणावर वचक नसल्याकारणाने व शासकीय प्रशासकियांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे, तरी प्रशासनाने बारकाईने लक्ष देऊन शेतकरी वर्गाची पिळवणूक त्वरित थांबवावी व यापुढे असे घडल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात शेतकरी दर्शन केंगे यांनी म्हटले आहे

चौकट

प्रशासनाने याबाबीची त्वरित दखल घेऊन या सर्व गोष्टींवर यापुढे नियमित देखरेख करणे गरजेचे असून, मी शेतकरी या नात्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेने पुढे आलो आहे.

- दर्शन केंगे, शेतकरी, पिंपळस, ता. निफाड

चौकट

बियाणे कायदा १९६६ नुसार संबंधित दुकानदाराला कायदेशीर नोटीस देण्यात आली असून तीन दिवसांत त्यांनी खुलासा सादर न केल्यास त्यानंतर परवाना निलंबित करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल

- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड.

(फोटो ०१ सायखेडा, १)

तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांना निवेदन देतांना शेतकरी दर्शन केंगे.

===Photopath===

011220\01nsk_30_01122020_13.jpg

===Caption===

तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांना निवेदन देतांना शेतकरी दर्शन केंगे.