शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
3
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
4
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
5
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
6
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
7
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
9
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
10
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
11
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
12
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
13
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
14
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
15
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
16
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
17
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
18
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
19
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
20
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

महिला क्रिकेटला रसिकांची दाद

By admin | Updated: July 3, 2017 00:57 IST

नाशिक : महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करीत रसिकांच्या मनावर फुंकर घातली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केल्याची सल तमाम क्रिकेट रसिकांच्या मनात असतानाच भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करीत भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर फुंकर घातली आहे. उभयतांमधील हा सामना नाशिककरांनी टीव्हीवर पाहण्याचा आनंद लुटला. एकता बिस्टच्या गोलंदाजीने सामन्यात रंगत आणल्याने सारेच टीव्ही संचासमोर खिळून होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना दोन्ही देशांमध्ये मोठ्या उत्कंठेने पाहिला जातो. पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून क्रिकेट सामन्यातील युद्ध म्हणूनच याकडे पाहिले जाते. मागील महिन्यात आशियाई स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला. या संपूर्ण स्पर्धेत भारताचे पारडे जड असताना अंतिम सामन्यात मात्र भारताला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. क्रिकेट रसिकांनी टीव्ही संच फोडून राग व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्र्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळविला गेला. या सामन्याविषयी क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता होती. रविवारची सुटी असल्याने आणि शहरात पाऊस सुरू असल्यामुळे क्रिकेट रसिकांनी टीव्हीवर हा सामना पाहण्याचा आनंद लुटला. घरातील सर्वांनीच सामन्याचा आनंद घेत महिला क्रिकेटच्या खेळाचे कौतुक केले. एरव्ही महिला क्रिकेटकडे कुणाचेही लक्ष जात नाही परंतु विश्वचषकातील हा सामना असल्यामुळे या सामन्याविषयी दोन दिवसांपासून चर्चा होतीच. भारताने पाकिस्तान महिला क्रिकेटचा पराभव करावा या अपेक्षेने टीव्हीसमोेर बसलेल्या प्रेक्षकांना भारतीय महिला क्रिकेटचा दर्जेदार खेळ बघायला मिळाला. काहीशा अवघड परिस्थितीतून सन्मानजनक धावसंख्येपर्यंत भारतीय फलंदाजांनी मजल मारली तर गोलंदाजांनी पाकिस्तानचा अवघ्या ७५ धावांत धुव्वा उडविल्याने क्रिकेट रसिकांनी महिला क्रिकेटला दाद दिली. केवळ १८ धावांत ५ बळी घेणाऱ्या एकता बिस्टच्या फिरकीने क्रिकेट रसिकांना चांगलाच आनंद दिला.