शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागांतील कामांना गती प्राप्त होणार

By admin | Updated: February 3, 2015 01:41 IST

प्रभागांतील कामांना गती प्राप्त होणार

नाशिक : महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे तुंबलेल्या विकासकामांची कोंडी आता हळूहळू मोकळी होणार असून, प्रशासनाने नगरसेवक निधीतून करावयाच्या अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवत एकदाची हंडी फोडल्याने प्रभागांतील कामांना गती प्राप्त होणार आहे. त्याचा शुभारंभ पालिकेतील बांधकाम विभागाने करत तीस लाखांच्या आतील विविध कामांच्या ई-निविदा काढल्या आहेत. विकासकामांबाबत प्रशासन जागचे हलल्याने गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाची धार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सिंहस्थ कामांच्या नावाखाली प्रभागातील विकासकामे रखडल्याची ओरड नगरसेवकांकडून सातत्याने होत आलेली आहे. महापालिकेला आठ महिने आयुक्त नव्हते त्यावेळी पालिकेचे कामकाज जवळपास ठप्पच झाले होते. नोव्हेंबरमध्ये डॉ. प्रवीण गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विकासकामे मार्गी लागण्याच्या शक्यतेने नगरसेवकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु आयुक्तांनी महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे नगरसेवक निधीत कपात करत तो २० लाखांवर आणला; शिवाय नगरसेवकांच्या कामांच्या फाईली परत माघारी पाठविल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला होता. महासभेतही त्याचे पडसाद उमटल्यानंतर महापौरांनी अखेर ५० लाखांच्या निधीवर शिक्कामोर्तब केले होते. तरीही कामे पुढे सरकत नसल्याने नगरसेवकांमध्ये खदखद सुरूच होती. त्याची ठिणगी नगरसेवक लक्ष्मण जायभावे आणि आयुक्त यांच्यात झालेल्या खडाजंगीने उडाली. त्याचेही पडसाद उमटले. दरम्यान, आयुक्तांनी आता नगरसेवक निधीतील कामांना हिरवा कंदील दाखविला असून, खातेप्रमुखांकडून मागविलेल्या याद्यांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यावर भर दिला जात आहे. प्रामख्याने एकाच विभागाची कामे न घेता कामांचा समतोल राखला जाणार आहे. नगरसेवक निधीतून करावयाच्या विकासकामांची हंडी फोडण्याचे काम सर्वप्रथम बांधकाम विभागाने केले आहे. बांधकाम विभागाने सामाजिक सभागृहाचे विस्तारीकरण, महिलांसाठी कम्युनिटी सेंटर, सभामंडपाला संरक्षक भिंत, समाजमंदिर, खुल्या जागेत अभ्यासिका व व्यायामशाळा, डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या सभामंडपाचे सुशोभिकरण, गटारींची दुरुस्ती व कॉँक्रिटीकरण, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, पेव्हरब्लॉक बसविणे, सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालये आदि कामांच्या ई-निविदा काढल्या आहेत. दीर्घ कालावधीनंतर सिंहस्थ कामांव्यतिरिक्त प्रभागांतील तुंबलेल्या विकासकामांच्याही फाईली निघाल्याने नगरसेवकांना दिलासा लाभला असून, प्रशासनानेही नगरसेवकांकडून कामांचा प्राधान्यक्रम मागविला आहे. (प्रतिनिधी)