शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उपकेंद्राचे काम तत्काळ सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:15 IST

शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्राचे बांधकाम लवकर सुरू करण्याबाबत उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि.२२) नाशिक दौऱ्यात चर्चा केली. नाशिक जिल्ह्यातील ...

शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्राचे बांधकाम लवकर सुरू करण्याबाबत उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि.२२) नाशिक दौऱ्यात चर्चा केली. नाशिक जिल्ह्यातील वेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या कार्यरत असणाऱ्या उपकेंद्रास अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठासंदर्भात येणाऱ्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी नाशिक ते पुणे असा प्रवास अनेकवेळा करावा लागतो. यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होतो. या अगोदरदेखील शिवनई येथील उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबत अनेक आंदोलने झाली आहेत. यामुळे ते लवकर सुरू व्हावे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच विद्यापीठाने अर्थसंकल्पात दोन कोटींच्या निधीची तरतूदही केली आहे. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे अद्याप उपकेंद्राचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेले नाही. या सर्व तांत्रिक अडचणींचा निपटारा उदय सामंत यांनी यावे‌ळी केला. ग्रामस्थांच्य मागणीनुसार एका बाजूने १५ फुटाचा रस्ता सोडण्यात आला असून या जागेतील अतिक्रमण आणि सुरत-चेन्नई महामार्गाची जागा सोडून उपक्रेंद्राच्या इमारतीचे काम सुरू करण्याचे निर्देश सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला केले आहे. या ठिकाणी सध्या उपकेंद्रासाठी १० हजार चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार असून, संरक्षक भिंतीचेही बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी १० ते २० फेब्रुवारीदरम्यान मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला शासनाच्या मान्यतेचे पत्र हस्तांतरित करतानाच उपकेंद्राचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच नाशिककरांसाठी शिवनई येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आकार घेईल, अशी आशा नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात निर्माण झाली आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विदयापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उपकुल सचिव एम. रासवे, उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे, कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील, सिनेट सदस्य अमित पाटील, डॉ. नंदू पवार, साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.

(आरफोटो- २२ उदय सामंत१) विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत. समवेत हेमंत गोजसे, डॉ. प्रफुल्ल पवार, एम. रासवे, डॉ. प्रशांत टोपे, आर. व्ही. पाटील, अमित पाटील, डॉ. नंदू पवार, साईनाथ दुर्गे आदी.