शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निधी वळविण्यावरून सभेचे थांबविले कामकाज

By admin | Updated: September 28, 2016 00:10 IST

जिल्हा परिषद आमसभा : न्यायालयात जाण्याचा इशारा

नाशिक : जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हा परिषदेचा २७०२ लेखाशिर्षचा २६ कोटींचा निधी वर्ग करण्यावरून मंगळवारी (दि.२७) सर्वसाधारण सभेचे कामकाज आक्रमक सदस्य व पदाधिकाऱ्यांनी थांबविले. जोपर्यंत या कामांच्या निविदा काढण्यात येत नाही तोपर्यंत सभा होणार नाही, असा निर्वाणीचा इशारा यावेळी बैठकीत देण्यात आला.मंगळवारी सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा सुरू झाल्यावर सदस्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षचा जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला नियतव्यय परस्पर जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ग करण्यावरून रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या आमसभेत वादळी चर्चा झाली. गटनेते रवींद्र देवरे यांनी जलयुक्त शिवार अभियान योजना चांगली असली तरी जिल्ह्णातील १९८६ गावांपैकी ती दोन वर्षांत अवघ्या ४०० गावांमध्ये राबविली जाणार आहे. तसेच त्यामुळे अन्य १५०० दुष्काळी गावांवर अन्याय होणार आहे. शिवाय जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावांमध्ये खरोखरच पाण्याची गरज आहे काय? हा आराखडा लोकप्रतिनिधींना न विचारताच बनविण्यात आला आहे. त्यात रामेश्वर (देवळा)सारख्या गावात धरण असताना आणि पाण्याची कमतरता नसताना काम धरण्यात आले आहे. १२०० लोकसंख्या असलेल्या गोहरण (चांदवड)सारख्या गावात ३९ बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली आहे? एकूणच जलयुक्त शिवार अभियानातील गावांची निवड कशी चुकीचे आहे? याची माहिती देतानाच जिल्हा परिषदेच्या हक्काचा आणि तोही आदिवासी उपयोजनेचा कोट्यवधींचा निधी असा परस्पर जलयुक्तसाठी वर्ग करण्याचे कारण काय? तो निधी वर्ग करण्यात येऊ नये, जिल्हा परिषदेला मंजूर नियतव्ययनुसारच निधी देण्यात यावा, असा ठराव त्यांनी मांडला. तो सभागृहात एकमुखाने संमत करण्यात आला. कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले यांनी निधी वर्र्ग करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आलेल्या पत्राचे वाचन केंले. नितीन पवार यांनी मागील वर्षी केलेल्या कामांचे आठ कोटींचे दायित्व अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले नसताना, मग आणखी निधी वर्ग करण्याचे कारण काय? अशी विचारणा केली. प्रवीण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर असा निधी वर्ग करण्याविरोधात जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषदेच्या २५ सदस्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, तसेच सभागृहात जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत कामकाज थांबविण्याची सूचना केली. शैलेश सूर्यवंशी यांनी नियोजन समिती सदस्यांचा याला विरोध असल्याचे सांगितले. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सभेचे कामकाज थांबविण्याचे जाहीर केले.उपाध्यक्ष न्यायालयात जाणारजिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्हा परिषदेचा निधी असा वळविण्याआधी त्यासाठी जिल्हा नियोजन समितीची मंजुरी घेणे आवश्यक होते. तसेच हा निधी आदिवासी भागासाठी असल्याने निधी वर्ग करताना त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष वर्ग करणे महत्त्वाचे होते. मात्र यातील कोणतीही कार्यवाही न करता थेट जिल्हा परिषदेचा मंजूर निधी, जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ग करण्याचा निधी जिल्हा परिषदेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असून आपण त्याविरोधात थेट न्यायालयात जाऊ, असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)