शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मडकीजांब गावतळ्याचे काम निकृष्टच

By admin | Updated: July 29, 2016 01:18 IST

अभियंत्यांचा दौरा : लवकरच अहवाल होणार सादर

 नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पहिल्याच पावसात वाहून गेलेल्या मडकीजांब येथील गावतळ्याचे काम निकृष्ट पद्धतीने बांधल्यानेच फुटल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.गुरुवारी (दि.२८) प्रभारी उपअभियंता व्ही. के. सोनवणे व शाखा अभियंता रावसाहेब देवरे यांनी मडकीजांब गावाला भेट देऊन संबंधित गावतळ्याच्या कामाची पाहणी केली. कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी त्यांना तत्काळ जाऊन गावतळ्याच्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी बुधवारी (दि.२७) या फुटलेल्या गावतळ्याच्या कामाची पाहणी केली होती. ११ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे मडकीजांब येथील गावतळे फुटून एका शेतकऱ्याच्या दीड एकर शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्याकडे करण्यात आली होती. फुटलेल्या गावतळ्याबाबत उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना विचारणा केली असता, त्यांनी मात्र आपल्याकडे दिंडोरी उपविभागाकडून अशी कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर वडजे यांनी कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना मडकीजांब येथील झालेल्या गावतळ्याच्या कामाबाबत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाघमारे यांनी उपअभियंता व्ही. के. सोनवणे यांना याप्रकरणी चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी मडकीजांबच्या फुटलेल्या गावतळ्याच्या कामाची पाहणी केली होती. प्रथमदर्शनी गावतळ्याचे काम निकृष्ट झाले असल्याचे त्यांना दिसून आले. आता उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत व तपासणीमध्येही ही बाब समोर आल्याने ग्रामपंचायतीवर व पर्यायाने ग्रामपंचायतीने नेमलेल्या ठेकेदारावर कारवाईची शक्यता आहे. (प्रतिनिधी)