शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले

By admin | Updated: June 5, 2016 23:27 IST

नाराजी : २००६ मध्ये मंजुरी मिळूनही काम अर्धवट

 वणी : आदिवासी भागाच्या सहभागातून क्रीडा निपुणतेत नावलौकिक मिळाल्यामुळे क्रीडाविश्वाचा प्रसार व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने क्रीडा संकुल निर्मितीस अग्रक्रम देण्यात आला. मात्र मोठा गाजावाजा करून सुरू झालेले क्रीडा संकुलाचे काम गेल्या काही कालावधीपासून रखडल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल निर्मिती आवश्यक असल्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. काही ठिकाणी यास मूर्त स्वरूप आले असले, तरी दिंडोरी तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने वणी-मुळाणा रस्त्यावर केआरटी हायस्कूलशेजारी अंदाजे अडीच एकर जागा ग्रामपालिकेने उपलब्ध करून दिली. सन २००६ साली २६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेत संरक्षक भिंत व सपाटीकरण याचा समावेश होता. तद्नंतर ७५ लाख रुपये क्रीडा संकुलासाठी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली.क्रीडा अधिकारी कार्यालय, जिम्नॅशियम हॉंल, कबड्डी, खो-खो मैदान, व्हॉलिबॉल मैदान धावण्यासाठी दोनशे मीटरचा ट्रॅक अशा सुविधांचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सदरचे काम पूर्ण करण्याची तरतूद होती. या कामाच्या देखरेखीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मंजूर निधी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये समितीकडे हस्तांतरित करण्यात येतो. जिल्हाधिकारी यांना सहाय्यभूत म्हणून क्रीडा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रांत अधिकारी या समितीचे अध्यक्ष होते. तहसीलदार व नियुक्त सदस्यांचा समावेश समितीत होता. समितीच्या निर्णयानंतर बांधकाम खात्याच्या हालचाली सुरू करण्याची तरतूद होती.दरम्यानच्या कालावधीत सदरचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, संबंधितांची उदासीनता व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हे काम रेंगाळले आहे. याठिकाणी संरक्षक भिंत व इमारतीव्यतिरिक्त काहीच काम झाल्याचे दिसून येत नाही. सदरचे काम संबंधितांच्या स्मृतिपटलावरून निघून गेले की काय, असा सवाल क्रीडाप्रेमींच्या मनात आहे. (वार्ताहर )