मालेगाव : (शफीक शेख) कोरोनाशी संपर्क नको म्हणून सर्वच जण सुरक्षितता बाळगत असतात. कुणी बाधित मृत पावला तर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कुणी नातेवाईक पुढे येत नाही. कोरोनामुळे आपल्याच माणसांविषयी अशी अस्पृश्यतेची भावना निर्माण झालेली असताना मालेगाव सारख्या हॉटस्पॉट बनलेल्या ठिकाणी कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष बाधितांच्या संपर्कात राहून धोका पत्करत सेवा बजावणारे वॉर्ड बॉय हे खरे योद्धा आहेत. मालेगाव महापालिकेत वॉर्ड बॉयचे काम करणारे संजय हिरे हे या योद्ध्यांपैकीच एक.गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटी कामगार म्हणून महापालिकेत वॉर्ड बॉयचे काम करणारे संजय बाबुराव हिरे प्रत्यक्ष कोरोना बाधीत रूग्णांसमवेत राहत आहेत. सटाणानाका भागातील बोरसेनगरमध्ये राहणारे संजय हिरे हे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील कोवीड सेंटरमध्ये वॉर्ड बॉय म्हणून अविरत सेवा बजावत आहेत.बाधीत रूग्णांशी कसे वर्तन करायचे, त्यांना कसा धीर द्यायचा याचे शिक्षण डॉ. संदीप खैरनार, स्वप्नील खैरनार, डॉ. हितेश महाले, डॉ. सपना ठाकरे यांच्याकडून मिळाले. दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता बाधितांना जेवण द्यायचं काम हिरे करतात. कोवीड सेंटरची झाडझुड करण्यापासून पाण्याची व्यवस्था करतात. त्यानंतर पीपीई कीट घालून आत प्रवेश करतात.काम संपल्यावर कीट सॅनिटाईझर करुन नष्ट करतात. रूग्णांना औषधे देण्याचे काम ते स्वत: करत असल्याने बाधितांशी त्यांचा जवळून सरळ संबंध येतो. हिरे आपल्या या सेवाकार्याबदद्दल बोलतात तेव्हा, जीव धोक्यात घालून ते कशाप्रकारे काम करत आहेत, यरुग्णांच्या सेवाकार्याबद्दल समाधानहिरे सांगतात, हातात हॅण्डग्लोज, पीपीई कीट घालून रोजच आमचा दिवस सुरू होतो. एकूण ११ वॉर्ड बॉय येथे कार्यरत आहेत. तीन शिफ्टमध्ये वॉर्ड बॉईजची ‘ड्युटी’ कोवीड सेंटरमध्ये लावलेली आहे. त्यावेळी रूग्णांचे अनेक नातेवाईक रडत येतात. माझ्या नातलगाकडे लक्ष द्या म्हणून विनवणी करतात. काही जण पैसेही देतात; परंतु आम्ही पैसे न घेता बाधितांच्या नातेवाईकांना धीर देतो. स्वत:ची काळजी घ्यायला सांगतो. त्यात बाधितांचे आई, भाऊ, पत्नी, मुले असतात. अनेक रूग्ण ५ ते ६ दिवसातच चांगले होवून घरी जातात. तेव्हा केलेल्या सेवाकार्याबदद्दल समाधान वाटत असल्याचे हिरे म्हकोविड सेंटरमधील रूग्णांना काढे देतो, गोळ्या देतो, कुणाला अंघोळ घालून देतो. काही रूग्ण रडत येतात. त्यावेळी तुम्ही चांगले तंदुरूस्त होवून बाहेर पडाल, असे सांगून त्यांची भीती घालवतो. आजपर्यंत एका जणाचा अपवाद सोडला तर ९९ टक्के रूग्ण बरे होवून गेले आहेत.- संजय हिरे, वॉर्डबॉय
कोरोना विषाणूशी रोज पंगा घेणारा वॉर्डबॉय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:28 IST