शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

राज यांच्या दाव्यांबाबत नाशकात आश्चर्य !

By admin | Updated: February 16, 2017 01:25 IST

ऐतिहासिक कामे : ...तर २९ नगरसेवक का सोडून गेले?

नाशिक : राज्यात एकमेव महापालिकेची सत्ता ताब्यात असलेल्या मनसेने गेल्या पंचवीस वर्षांत विविध कामे केली असल्याचा दावा राज ठाकरे हे मुंबईतील सभेत करीत आहेत. तथापि, इतकी ऐतिहासिक कामगिरी मनसेने बजावली असेल तर या पक्षाच्या चाळीसपैकी २९ नगरसेवकांनी रामराम का केला, असा प्रश्न निर्माण होत आहे. योगायोगाने राज यांच्या सभेच्या दोनच दिवस अगोदर हाच प्रश्न त्यांचे पुतणे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये जाहीर सभेत केला होता.मनसेची नाशिकमध्ये सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या स्वरूपाचे नाशिक बदलाचे चित्र दाखवले होते, त्याचे माध्यमांमधून वारंवार स्मरण करून दिल्यानंतर राज यांनी आत्ताशी आठ महिने झाले, वर्ष झाले, असे सांगत होते. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर वन खात्याच्या ताब्यातील वनौषधी उद्यानात टाटा उद्योग समूहाच्या टाटा ट्रस्टकडून सीएसआर अ‍ॅक्टीव्हीटीतून लेझर शो करून काही प्रमाणात सुशोभिकरण करण्यात आले. होळकर पुलाजवळील वॉटर कर्टन हा कारंजा व एक शंभर फुटी कारंजा आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने केलेले शस्त्रसंग्रहालय तसेच उड्डाणपुलाखालील भितींचे सुशोभिकरण ही कामे निवडणुकीची घोषणा होण्याच्या तोंडावर केली, परंतु ही कामे एकप्रकारचे कॉस्मेटीक चेंजेस आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. हीच कामे मुंबईतील मतदारांना दाखविण्यात येत आहेत. बाकी साडेचारशे कोटींचे रिंगरोड हे दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थामध्ये होतच असतात, त्याचप्रमाणे यंदाही झाली आहे. अंतर्गत छोटे रस्ते नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर करण्याची परंपराच आहे. तसेच केंद्र सरकारच्या नेहरू अभियानातील प्रलंबित मुकणे धरणातील थेट जलवाहिनी योजना आता या योजनेची मुदत संपताना आता नव्या सरकारच्या योजनेतून हाती घेण्यात आली आहे. ज्याचा उल्लेख राज यांच्या मुंबईतील सभेत करण्यात आला आहे. मुंबई येथील सभांमध्ये राज यांच्याकडून या योजनांना उजाळा देण्यात येत असून, नाशिकमध्ये येऊन कामे बघा, असे सांगितले जात आहे. कामे अखेरच्या टप्प्यात झाली असली तरी राज यांच्या म्हणण्यानुसार खरोखरीच इतकी ऐतिहासिक कामे झाली असतील तर मग, निवडणुकीतील निकालाचा अंदाज अगोदरच घेऊन या पक्षाचे २९ नगरसेवक शिवसेना, भाजपा इतकेच नव्हे तर नाशिकमध्ये सध्या हलाखीच्या स्थितीत असलेल्या कॉँग्रेस पक्षामध्ये का दाखल झाले, हा आदित्य ठाकरे यांना पडलेला प्रश्न नाशिककरांनाही पडला आहे.