शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण जागांवर महिलांचीही दावेदारी

By admin | Updated: October 15, 2016 02:06 IST

चुरस वाढणार : काही नगरसेविकांची निवृत्ती शक्य

 नाशिक : महापालिका निवडणुकीत ३१ प्रभागांमध्ये १२२ जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव असल्या तरी सर्वसाधारण जागांवर काही महिलांनी दावेदारी सांगण्यास सुरुवात केल्याने पुरुषांबरोबरीने महिलांच्या लढतीमुळे चुरस वाढणार आहे. दरम्यान, विद्यमान नगरसेविकांमधील काही नगरसेविका निवृत्ती पत्करण्याची शक्यता असून, त्यांचा वारसा चालविण्यासाठी कुटुंबीयातीलच घटक पुढे येण्याची चर्चा सुरू झाली आहे.यंदा होणाऱ्या महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आली असून, ३१ प्रभाग मिळून १२२ सदस्य निवडून जाणार आहेत. त्यात ३० जागा सर्वसाधारण महिला, नऊ जागा अनुसूचित जाती, पाच जागा अनुसूचित जमाती आणि १७ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ६१ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिलांसाठी ३२ जागा राखीव होत्या. त्यात यंदा दोनने घट झाली आहे, तर अनुसूचित जाती व जमाती यांची प्रत्येकी एक जागा वाढली आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा ‘जैसे थे’ आहेत. मागील निवडणुकीत ६३ महिला महापालिकेवर निवडून गेल्या होत्या. त्यात दोन महिलांनी पुरुषांबरोबर लढत देत विजयश्री खेचून आणली होती. प्रभाग पाचमधून अनुसूचित जमाती या आरक्षित जागेवर भाजपाच्या रंजना भानसी यांनी, तर प्रभाग २४ मधून मनसेच्या सुजाता डेरे यांनी सर्वसाधारण जागेवर लढत विजय संपादन केला होता. यंदा चार सदस्यीय प्रभागरचना, इच्छुकांची वाढती संख्या, पक्षीय पॅनलमध्ये सहभागासाठी तीव्र स्पर्धा यामुळे प्रामुख्याने सर्वसाधारण जागांवर चुरस वाढण्याची शक्यता आहे. त्यात सर्वसाधारण जागांवर काही आजी-माजी मातब्बर महिला नगरसेवकांनी दावेदारी सांगण्यास सुरुवात केल्याने पुरुष इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर दावेदारीचे संदेश फिरत असल्याने संबंधित प्रभागांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)