शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमंजुरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक

By admin | Updated: April 23, 2016 00:01 IST

सिडकोतील प्रकार : ११ लाखांचा अपहार

नाशिक : कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून अंबड परिसरातील एका बचत गटातील महिलांची सुमारे साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित वहिदा इब्राहिम खान (औदुंबर स्टॉप, सिडको) या महिलेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित वहिदा इब्राहिम खान या महिलेने बचत गटांना कर्ज मंजूर करून देते असे सांगून कर्ज न मिळाल्यास भरलेले पैसे परत देण्याचे आश्वासन दिले़ त्यानुसार कामटवाडे येथील महिला बचतगटाच्या सदस्य कल्पना शिवाजी हरिमहाले (योगेश्वर विहार, कामटवाडे) व इतर महिलांच्या घरी जाऊन पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांची रक्कम जमा करून त्यांना नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे पाच लाख रुपयांचे धनादेश दिले़कल्पना हरिमहाले यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश देवळाली व्यापारी बँकेत टाकला असता तो न वटता परता आला़ त्यामुळे महाले यांनी कर्ज मंजुरीसाठी भरलेल्या पैसे व कर्जाबाबत विचारणा केला असता खान यांनी पैशासाठी त्रास देऊ नका अन्यथा मी तुमची पोलिसांकडे तक्रार करेल अशी धमकी दिली़ विशेष म्हणजे संशयित खानने कर्जाचे आमिष दाखवून उर्मिला गायकवाड (३ लाख ७५ हजार रुपये), सुलताना शेख (३ लाख रुपये), स्मिता नाईक (२ लाख रुपये), मीराबाई बेलदार (दीड लाख रुपये), रंजना राजपूत (७० हजार रुपये) या महिलांकडून ११ लाख ४० हजार रुपये जमा करून फसवणूक केली आहे़ या प्रकरणी कल्पना हरिमहाले यांनी संशयित खानविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ दरम्यान, कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने बचत गटातील महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडले असून यामध्ये महिलाच सूत्रधार असल्याचे अनेकदा समोरही आले आहे. (प्रतिनिधी)