नायगाव : ग्रामपंचायत सदस्याकडून आपल्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आल्याची तक्रार नायगाव येथील सरपंच इंदुमती मुरलीधर कातकाडे यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठक शनिवारी (दि. १०) होती. बैठक सुरू होण्यापूर्वी सरपंच सौ. कातकाडे या कार्यालयात बसल्या होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीलेश ऊर्फ शंकर तुकाराम कातकाडे हे आले. त्यांनी आज मासिक बैठक घेऊ नका, असे सांगून कोणत्याही सदस्यांना मी स्वाक्षऱ्या करून देणार नसल्याचे म्हटले. तसेच माझ्या परवानगीशिवाय बैठक घ्यायची नाही व मी ती घेऊ देणार नाही, असा दम दिला. त्यानंतर त्यांनी आपल्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचे सरपंच कातकाडे यांनी तक्रारीत म्हटले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (वार्ताहर)
महिला सरपंचास धक्काबुक्की
By admin | Updated: September 13, 2016 00:39 IST