शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मयतांनाच दाखविले साक्षीदार

By admin | Updated: February 10, 2016 23:24 IST

चमत्कार : मालेगाव तहसीलच्या जबाबपत्रात नोंद

प्रवीण साळुंके  मालेगावयेथील तहसील खाते भ्रष्टाचार व विविध कारणांनी मागील तीन ते चार वर्षात राज्यात चांगलेच बदनाम झाले आहे. या कार्यालयाचे अनेक चमत्कार असून, असाच प्रकार तालुक्यातील हाताने येथील स्वस्त धान्य दुकानाच्या जबाबात संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. यात तहसीलच्या जबाबाच्या कागदपत्रात दोन व्यक्ती मयत असूनही त्यांचे प्रत्यक्षदर्शी जबाब असल्याचा आरोप करण्यात येत आहे.तालुक्यातील हाताने येथील स्वस्त धान्य दुकानाविषयी अनेक तक्रारी असल्याने परवाना रद्द करण्यात आला होता. यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशावर ४ डिसेंबर २०१५ला पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात संशय घेण्यास अनेक जागा आहेत. मिळालेल्या पंचनाम्याच्या कागदपत्रात घेण्यात आलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातील व्यक्तींपैकी एक व्यक्ती ६ एप्रिल २००८ तर दुसरी व्यक्ती ८ मे २०१३ रोजी मयत झाल्याची ग्रामपंचायतीत नोंद आहे. तरीही त्यांनी प्रत्यक्ष जबाब दिलेल्यांमध्ये त्यांचे नाव आहे. या जबाब देणाऱ्यात एक व्यक्तीच्या नावापुढे ग्रामपंचायत सदस्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांमध्ये त्याचे नाव नाही. यातील एका जबाबावर स्वाक्षरी नाही, तसेच एकात प्रत्यक्षदर्शीचे नाव व स्वाक्षरी यांच्यात मोठी तफावत आहे. एका जबाबात मनुष्याच्या नावापुढे महिलेची सही असून, दोन जबाबावर एकाच व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या आहेत तर एका जबाबात नाव व शिधापत्रिका क्रमांक यात तफावत आहे. हा पंचनामा घाईघाईत करण्यात आल्याचे कागदपत्रावरून दिसून येते. या अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालात एक हजार रुपये दंडाची शिफारस केली आहे. या अहवालात किरकोळ तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे.सदर दुकानदारांविषयी अनेक तक्रारी असल्याने ग्रामपंचायतीने याविषयी चर्चा करण्यासाठी ग्रामसभेत ठेवला. त्यावर १९ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेत चार क्रमांकाच्या विषयात धान्य वाटपाच्या तक्रारीवर चर्चा करण्यात येऊन परवाना रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. सदर ठरावावर तहसीलदारांनी यावर ४ सप्टेंबर २०१५ रोजी पुरवठा निरीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यांनी १५ सप्टेंबर २०१५ रोजी पंचनामा करून दिलेल्या अहवालात परवाना रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यावर २ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसीलदारांनी सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात येऊन गावाचे धान्य वाटप खडकीच्या दुकानदाराला तात्पुरत्या स्वरूपात दिले होते.