नाशिक : येथील गणेश लोखंडे या रायडरने बंगळुरू येथे झालेल्या एमआरएफ मो ग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे़ गणेशने या स्पर्धेत एमएक्स-२ प्रकारात इम्पोर्टेड बाइक २५० ते ५०० सीसी गु्रपमध्ये हा विजय मिळवला़ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन पात्रता फेरीतही गणेशने अव्वल स्थानी राहत मुख्य फेरीत सहज प्रवेश केला होता़ आज झालेल्या अखेरच्या फेरीत काळजाचा ठोका चुकविणाऱ्या उड्या घेऊन सर्वांना मागे टाकत मोठ्या फरकाने गणेशने सहज विजय संपादन केला़ नाशिक येथे महिनाभरापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय सुपर मोटोक्रॉसच्या पहिल्या टप्प्याचा विजेताही गणेश ठरला होता, तर या स्पर्धेत त्याच्या गाडीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पुढील कोल्हापूर येथे झालेल्या टप्प्यात त्याला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले होते़ यानंतरही त्याने अपेक्षापेक्षा अधिक प्रगती करत राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले आहे़
नाशिकचा गणेश लोखंडे राष्ट्रीय मोटोक्रॉसचा विजेता
By admin | Updated: December 1, 2014 01:00 IST