शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्ग अवर्गीकृतचा प्रस्ताव बारगळणार?

By admin | Updated: May 6, 2017 01:46 IST

नाशिक : पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्याच्या हालचाली सुरूच आहेत

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्याच्या हालचाली सुरूच असून, महापालिकेच्या महासभेत त्यासंबंधीचा ठराव करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. मात्र, जिल्ह्याला लागूनच असलेल्या जळगाव महापालिकेकडे शासनाने चारच दिवसांपूर्वी अवर्गीकृत केलेले सहा राज्यमार्ग पुनश्च सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभालीसाठी वर्ग केलेले आहेत. त्यामुळे जळगाव महापालिकेचेच अनुकरण करत सत्ताधारी भाजपाकडून नाशिक महापालिकेच्या महासभेत सदर प्रस्ताव आणण्याची शक्यता धूसर झाली आहे. शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्य विक्रीची दुकाने वाचविण्यासाठी मद्यविक्रेत्यांच्या लॉबीची आटापिटा सुरूच आहे. सदर रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासंबंधीचा ठराव जादा विषयाच्या माध्यमातून मागील दाराने घुसविण्याचा डाव फसल्यानंतर पुन्हा एकदा शासनस्तरावरून महासभेत ठराव आणण्यासाठी दबाव टाकला जात आहे. शहरातून जाणारे राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्यास शिवसेनेने यापूर्वीच विरोध दर्शविला आहे; मात्र सत्ताधारी भाजपाकडून अद्याप कोणतीही भूमिका अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. पालकमंत्र्यांनीही याबाबत तपासणी करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत त्याबाबत संदिग्धता कायम ठेवली होती. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या महासभेत सदर ठराव करण्याच्या हालचाली सुरू असतानाच जळगाव महापालिकेकडे शासनाने चारच दिवसांपूर्वी अवर्गीकृत केलेले सहा रस्ते पुनश्च वर्गीकृत करण्याचे व महापालिकेच्या ताब्यात न देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. चारच दिवसांत सदर रस्ते अवर्गीकृतवरून वर्गीकृत करण्यात येऊन ते देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहेत. जळगाव येथील महापालिका आयुक्तांनी शासनाला त्याबाबत पत्र लिहून रस्ते अवर्गीकृत करण्यास असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळेच शासनाला चारच दिवसांत आपला निर्णय फिरवावा लागला आहे. जळगाव महापालिकेत आता रस्ता अवर्गीकृत करण्याचा प्रश्न मिटल्यानंतर नाशिक महापालिकेतही त्याचेच अनुकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेत ठराव आणू पाहणाऱ्या लॉबीचीही त्यामुळे कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.