शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

अशी वेळच का यावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:46 IST

आपल्या अधिकाराबद्दल जागरूक असणारी व्यक्ती कर्तव्याबद्दलही सजग असतेच असे नाही. त्यातही सरकारी कामाबद्दल म्हणायचे तर, नोकरशाहीच्या दिरंगाईचा किंवा कामातील कुचराईचा अनुभव न घेतलेली व्यक्ती शोधून सापडू नये ही वस्तुस्थिती आहे.

साराशआपल्या अधिकाराबद्दल जागरूक असणारी व्यक्ती कर्तव्याबद्दलही सजग असतेच असे नाही. त्यातही सरकारी कामाबद्दल म्हणायचे तर, नोकरशाहीच्या दिरंगाईचा किंवा कामातील कुचराईचा अनुभव न घेतलेली व्यक्ती शोधून सापडू नये ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही दप्तर दिरंगाई सोडून कामकाज न सुधारल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्याची वेळ विभागीय आयुक्तांवर आली. यातून आयुक्तांची संवेदनशीलता दिसून येतानाच यंत्रणांमधील संवेदनशून्यताही अधिकृतरीत्या अधोरेखित व्हावी.सरकारी यंत्रणांमधील बेफिकिरीची अथवा बेजबाबदारीची मानसिकता हा अनादी अनंतकाळापासून चालत आलेला विषय आहे. त्याबद्दल वेळोवेळी टीका होते, त्यामुळे प्रासंगिक स्वरूपात नोकरशाहीला धारेवर धरले जाते. पण कालांतराने परिस्थिती ‘जैसे थे’च झाल्याचा अनुभव येतो. बरे, एवढे सारे होत असताना व नागरिकांची याबाबतची ओरड कायम असताना कोणत्याही सरकारी आस्थापनातील वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्या हाताखालील यंत्रणेच्या कुचराईपणाबद्दल आपल्या सहकाºयांची शक्यतो पाठराखण करण्याचीच भूमिका घेताना दिसून येतो. पण, विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन त्यात याबद्दलचे खडे बोल सुनावल्याने या व्यवस्थेत नाडले गेलेल्यांना काहीसा समाधानाचा सुस्कारा सोडता यावा. अर्थात, या त्यांच्या तंबीने फार फरक पडेल अशाही भ्रमात राहण्याचे कारण नाही, मात्र झगडे यांनी यासंदर्भातील अव्यवस्थेशी व दप्तर दिरंगाईशी ‘झगडा’ पुकारण्याचे धाडस दाखविले ते महत्त्वाचे ठरावे. हल्ली अशी संवेदनशीलता लयास गेलेली असल्याने अपवाद वगळता कोणी अधिकारी असे धाडसही दाखवेनासे झाले आहे. त्यातून जिल्हाधिकाºयांचा तहसीलदारांवर, तहसीलदारांचा तलाठी व मंडल अधिकाºयांवर धाक वा नियंत्रणच राहिले नसल्याचे निरीक्षण खुद्द झगडे यांनी प्रांजळपणे नोंदविले आहे. कसे राहील ते, कारण महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय असो की अन्य कोणतेही कार्यालय; तेथील वरिष्ठाधिकारी बदलून आले की, सर्वप्रथम लेटलतिफांना हुडकण्याचे काम केले जाते. उशिरा उगवणाºयांना किंवा जागेवर न सापडणाºयांना कारणे दाखवा नोटिसींचा दणका दिला जातो; परंतु अधिकतर लोक कार्यालयीन कामासाठी साइटवर गेल्याचे दाखवून सुटका करून घेताना दिसून येतात. त्यामुळे धाक निर्माण होण्याचा किंवा नियंत्रणाचा प्रश्नच निकाली निघतो. दप्तर दिरंगाई वाढीस लागण्यामागे अशी अनेक कारणे देता येणारी आहेत. जन्म-मृत्यूसह कोणतेही दाखले असो की, ७/१२ उतारे; ते ठरावीक वेळेत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे; पण तसे होत नाही म्हणूनच सेवा कायदा लागू करण्यात आला आहे. तरी दिरंगाईच्या अनुभवास सामोरे जावे लागते. विविध सरकारी कार्यालयात काम करणाºया अधिकारी कर्मचाºयांच्या अनेकविध कर्मचारी संघटना आहेत त्या आपापल्या सदस्यांच्या अधिकारांबद्दल नेहमी आग्रही असतात, पण सदस्यांना कर्तव्याबद्दलची जाणीव करून देताना फारशा दिसत नाहीत. म्हणूनच विभागीय आयुक्तांनी खास बैठक घेऊन अधिकाºयांना त्यांचे काम चोख बजावण्याचे जे सुनावले ते महत्त्वाचे ठरावे.