शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी दिवसभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 21:40 IST

वटारला टंचाई : चार दिवसाआड पाणी; टॅँकरची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, कंधाणे, डोंगरेज आदि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. वटार येथे ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम करूनही गावाला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने टॅँकरची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच प्रशांत बागुल यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळाला सामोरा जाणारा परिसरातील शेतकरीवर्ग यावर्षी तर दुष्काळाच्या छायेत आहे. विहिरींची पाण्याची पातळी खालावलेली असून, लावलेला कांदा पाण्याअभावी सोडण्याच्या बेतात बळीराजा आहे. या असमानी व सुलतानी संकटांनी पिचलेला बळीराजासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला असून, व्याजाने उसने पैसे घेऊन विहिरींचे काम केले; पण गाठीचा पैसाही गेला व उलट कर्जाचा बोजा अंगावर पडला. ग्रामपंचायतीने दखल घेत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम करूनही विहिरीला पाणी कमकुवत स्वरूपाचे लागले असून, ४० ते ४५ मिनिट विहीर चालते. त्यामुळे पाण्याची टाकी तीन ते चार दिवस भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने निर्णय घेतला असून, चार दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. जर पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर मे व जूनमध्ये १० ते १५ दिवसात गावाला पाणीपुरवठा होईल, असे मत सरपंचानी व्यक्त केले आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हवी.शेतकऱ्यांच्या विहिरींचे तळ गाठल्याने सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसला असून, ऐन जांगडवर असलेला कांदा शेतकऱ्यांना सोडावा लागत आहे. न पेलवणारा खर्च करून लागवड केलेला कांदा शेवटी शेतकऱ्यांना डोळ्यात आसू आणत आहेत. जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा तर फार मोठा प्रश्न उभा राहिला असून, चाऱ्याच्या प्रशासनाने छावण्या लावण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)