शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांच्या जखमांचा ‘दाह’ केव्हा थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : शहरासह जिल्ह्यात विविध अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या वन्यजीवांच्या जखमांचा ‘दाह’ केव्हा थांबणार? असा प्रश्न नाशिककर वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित ...

नाशिक : शहरासह जिल्ह्यात विविध अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या वन्यजीवांच्या जखमांचा ‘दाह’ केव्हा थांबणार? असा प्रश्न नाशिककर वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. शहरासह जिल्ह्यात बिबटे, कोल्हे, तरस, माकड, वानर, मोर यांसारखे वन्यजीव विविध कारणास्तव जखमी होतात, अशा वेळी वनविभागाकडून वन्यजीवप्रेमींच्या मदतीने त्यांना रेस्क्यूही केले जाते; मात्र शहरात त्यांच्यावर उपचार व सुश्रुषा करण्यासाठी हक्काची स्वतंत्र जागाच उपलब्ध नसल्याने जखमींची ससेहोलपट होत आहे.

नाशकात ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर सुरू व्हावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. वनविभागाकडून याबाबत वारंवार प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी नागपूर कार्यालयाकडे पाठविले जातात; मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. नुकतेच नाशिक पश्चिम वनविभागाने या उपचार केंद्राचा नव्याने प्रस्ताव तयार करत आराखडा जिल्हा नियोजन विकास समितीच्यापुढे ठेवण्यात आला आहे; मात्र या प्रस्तावाबाबत अद्याप कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही. एकूणच वन्यजीवांच्या जखमांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी आवश्यक असणारे ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटरला कधी मुहूर्त मिळेल याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

वनविभागाच्या म्हसरुळ येथील वनउपज आगारामधील एक हेक्टर जागेवर वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी यांच्यावर औषधोपचार करण्याकरिता अद्ययावत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे सेंटर उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा नाशिक वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. यासाठी अंदाजे पाच कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून ‘डीपीडीसी’कडून निधीला मिळालेल्या मंजुरीनंतर वन्यजीवांच्या जखमांचा दाह शमणार आहे.

---इन्फो---

कोल्ह्याला हलविणार पुण्याला

शनिवारी रात्री नाशिक-त्र्यंबक रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका दीड ते दोन वर्षांच्या कोल्ह्याला एका भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत कोल्हा जखमी झाला. सुदैवाने या अपघातात कोल्ह्याचे प्राण वाचले; मात्र हाडे फॅक्चर झाल्यामुळे पुढील उपचारांसाठी कोल्ह्याला पुण्याला ‘रेस्क्यू’ चॅरिटेबल ट्रस्टच्या उपचार केंद्रात हलवावे लागणार आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे एक कोल्हा गंभीर जखमी झाला होता. त्यालाही पुण्यात उपचारार्थ हलवावे लागले होते. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. नाशिकला उपचाराचे अद्ययावत केंद्र अस्तित्वात नसल्यामुळे वन्यप्राण्यांना थेट पुण्याला हलविण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग वनविभागापुढे सध्या तरी नाही.

---

२१पीएचएफबी७६ जखमी कोल्हा

===Photopath===

210221\21nsk_20_21022021_13.jpg

===Caption===

अपघातात जखमी कोल्हा