शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या भीतीपोटी दुकाने बंद राहतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:17 IST

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील जुने नाशिक परिसरातील सारडा सर्कल ते फाळके रोड यादरम्यान असलेल्या विविध जुन्या वस्तू विक्री ...

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील जुने नाशिक परिसरातील सारडा सर्कल ते फाळके रोड यादरम्यान असलेल्या विविध जुन्या वस्तू विक्री तसेच लोखंड, पत्रा विक्रीच्या दुकानांच्या बंद शटरपुढे बुधवारी रात्री एक अज्ञात व्यक्ती येऊन काहीतरी उतारा ठेवून पळ काढत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले. गुरुवारी (दि.१४) सकाळी जेव्हा व्यापारी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आले असता, येथील पंधरा ते वीस दुकानांच्या शटरपुढे भारलेले तांदूळ, मिर्ची, राख अशा तत्सम वस्तूंचा ‘उतारा’ आढळून आल्याने सर्वच व्यापारी अवाक‌् झाले. त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आणि त्यांनी दुकानांचे शटर बंदच ठेवणे पसंत केले. दरम्यान, यापैकी एका व्यावसायिकाचा लहान मुलगा अचानकपणे घरी आजारी पडला आणि वांट्या करू लागल्याने सर्वांमध्ये घबराट पसरली. त्यांच्या कुटुंबातील महिला वर्गदेखील धास्तावला. ही बाब जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना समजली तेव्हा डॉ. टी. आर. गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, सुशीलकुमार इंदवे, महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे आदींनी फाळके रोडवर धाव घेतली. यावेळी उपस्थित व्यावसायिकांचे त्यांनी समुपदेशन करत अंधश्रद्धेचा प्रकार लक्षात आणून दिला आणि त्यांच्या मनातील भीती घालविण्यास यश मिळविले. सकाळी भर बाजारात गर्दी जमल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह व्यावसायिकांनी घडलेला प्रकार त्यांच्यापुढे कथन केला. यावेळी संबंधित व्यावसायिकांच्या वतीने आसिफ सय्यद, मुदस्सर सय्यद यांनी त्या अज्ञात संशयिताविरुद्ध तक्रार पोलिसांकडे केली आहे. सीसीटीव्ही फुटेजअधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

--इन्फो--

निकालासाठी दुकानांपुढे केला ‘उतारा’

व्यापारी वर्गाचा जागेवरून सुरू असलेला वाद न्यायप्रविष्ट आहे. या खटल्याची सुनावणी जवळ आली असून, न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने यावा यासाठी भोंदू बाबाच्या सांगण्यावरून अज्ञात व्यक्तीने येथील काही दुकानांपुढे ‘उतारा’ अमावास्येचा मुहूर्तावर आणून ठेवल्याची परिसरात चर्चा रंगली होती.

---

फोटो आर वर १४जुने नाशिक नावाने सेव्ह आहे.