शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

विवाह मुहूर्त अडकणार वीकेंड लॉकडाऊनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने नाशिक शहरात निर्बंध शिथिल झाले असले तरी वीकेंड लॉकडाऊनमध्ये मंगल कार्यालये आणि लॉन्सदेखील ...

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने नाशिक शहरात निर्बंध शिथिल झाले असले तरी वीकेंड लॉकडाऊनमध्ये मंगल कार्यालये आणि लॉन्सदेखील समाविष्ट करण्यात आल्याने चार विवाह मुहूर्त लॉकडाऊनमध्ये अडकणार असल्याने त्यात शिथिलता द्यावी, अशी मागणी नाशिक मंगल कार्यालय लॉन्स व हॉल असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. ९) करण्यात आली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. उद्धव निमसे, अध्यक्ष सुनील चेापडा, कार्याध्यक्ष संदीप काकड तसेच शंकरराव पिंगळे, समाधान जेजूरकर, केशव डिंगोरे यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात अडचणी मांडल्या आहेत. १६ जून ते १३ जुलै दरम्यान केवळ दहा विवाह मुहूर्त आहेत. त्यातील चार विवाह मुहूर्त हे शनिवार आणि रविवार असे आहेत. त्यामुळे ज्यांच्या विवाह तारखा याच शनिवारी आणि रविवारी आहेत, त्यांची अडचण होत आहे. निर्बंधांमुळे अशा कुटुंबीयांना आता विवाह सोहळे पुढे ढकलावे लागणार आहेत. त्यामुळे आरोग्य नियमांचे पालन करून विवाह सोहळ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

छायाचित्र ०९ लॉन्स...नाशिक शहरातील विवाह सोहळ्यांना शनिवार- रविवारी देखील परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन आयुक्त कैलास जाधव यांना देताना उद्धव निमसे, सुनील चोपडा, संदीप काकड, शंकरराव पिंगळे, समाधान जेजूरकर, केशव डिंगोरे, आदी.