शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पर्वणी सरली... घोषणा विरली...

By admin | Updated: October 27, 2015 22:43 IST

नियोजनाचा अभाव : आखाड्यांच्या जागांना ना कुंपण.. ना संरक्षण..., आश्वासनाचाही विसर

नाशिक : दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या तीनही प्रमुख आखाड्यांना तपोवनात कायमस्वरूपी जागा देऊन त्या जागांचे बारा वर्षे जतन व संरक्षण करण्याची प्रशासनाची घोषणा कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी आटोपताच हवेत विरली आहे. दिगंबर, निर्र्माेही आणि निर्वाणी या तिन्ही आखाड्यांच्या इष्टदेवतांच्या पादुका असलेल्या ठिकाणी फक्त नावापुरतेच चबुतरे उभे राहिले असून, सध्या या आखाड्यांच्या मोजक्याच साधूंकडून या पादुकांची पूजा-अर्चा व संरक्षण केले जात असले तरी, या जागांना ना तारेचे कुंपण, ना संरक्षणाच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना प्रशासन करू शकले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांचे आखाडे व खालशांच्या जागेचा प्रश्न दर बारा वर्षांनी प्रशासनाला भेडसावित असून, त्यासाठी तपोवनात कायमस्वरूपी जागा संपादित करण्याची गरज वेळोवेळी बोलून दाखविण्यात आलेली आहे; परंतु योग्य मोबदल्याशिवाय जागा देण्यास तपोवनातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे दर बारा वर्षांनी तात्पुरत्या स्वरूपात जागा भाड्याने अधिग्रहीत करून प्रशासनाला वेळ मारून न्यावी लागते. यंदाच्या कुंभमेळ्यातही साधू-महंतांच्या मागणीच्या तुलनेत म्हणजे पाचशे एकरपैकी सव्वातीनशे एकर जागा प्रशासनाला अधिग्रहीत करावी लागली, त्यात महापालिकेच्या मालकीची ५४ एकर जागेचा समावेश आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या आखाड्यांना मोठ्या प्रमाणावर मुबलक व मोक्याच्या जागा लागतात, नव्हे त्यांचा आग्रहच तसा असल्यामुळे त्यांना जागावाटप करणे हीदेखील मोठी डोकेदुखी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून यंदाच्या कुंभमेळ्यात प्रमुख तीन आखाड्यांना ज्या जागा प्रशासनाकडून बहाल करण्यात आल्या होत्या, त्या जागांवरच या आखाड्यांची धर्मध्वजा फडकली होती व इष्टदेवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याच जागा पुढच्या बारा वर्षांनी त्याच आखाड्याला दिल्या जाव्यात यासाठी आखाड्यांच्या इष्टदेवतांच्या प्रतिष्ठापनेसाठी प्रशासनाने उभारलेले सीमेंटचे चबुतरे बारा वर्षे तसेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने तसे लेखी पत्रही आखाड्याच्या प्रमुख महंतांना देऊन आखाड्यांनी चबुतऱ्यांवर इष्टदेवतांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केलेली असल्याने या ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी त्याला बंदिस्त सभामंडप व तारेचे कुंपण उभारून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून असलेल्या आखाड्यांनी तिसरी पर्वणी आटोपल्यानंतर आपल्या मूळ स्थानावर परतले व त्याला महिन्याचा कालावधी उलटला; परंतु आखाड्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा त्यांना विसर पडला आहे. सध्या दिगंबर आखाड्याच्या चरणपादुकांची देखभाल व संरक्षण दिगंबर आखाड्याचे स्थानिक साधू-महंत करीत आहेत, तर निर्माेही व निर्वाणी या दोन्ही आखाड्यांच्या चरणपादुकांच्या संरक्षणासाठी काही साधूंनीच पुढाकार घेतला आहे. चबुतऱ्यावरील चरणपादुकांचे पावित्र्य जपले जावे यासाठी या साधूंनी चबुतऱ्याजवळ तंबू ठोकला आहे, तर चबुतऱ्याच्या तिन्ही बाजूंनी पत्र्याचे शेड उभे करून पादुकांचे संरक्षण केले जात आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष : संरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचानाशिकच्या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या तिन्ही प्रमुख आखाड्यांना प्रशासनाने कायमस्वरूपी जागा देण्याची तयारी दर्शवून त्यांच्या इष्टदेवतांच्या चरणपादुकांचे बारा वर्षे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी सोडला, तर तपोवनात येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने गोदावरी-कपिला संगम व रामकुटी या दोन गोष्टींनाच अधिक धार्मिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे ज्या जागा आखाड्यांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होऊन धार्मिक पावित्र्य भंग होण्याची शक्यता साधू-महंतांनी व्यक्त केली आहे. तपोवनात असाही फिरस्ते, भिकाऱ्यांचा वावर असतो, त्यामुळे त्यांच्याकडूनच या जागा ताब्यात घेतल्या जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.