शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

व्हायचंय लोकप्रतिनिधी अन् त्रास लोकांना...

By admin | Updated: February 5, 2017 22:50 IST

संताप : मतदारराजाची वाट ‘बिकट’

नाशिक : लोकांचे प्रतिनिधित्व करण्याच्या इच्छेपोटी जे निवडणूक रिंगणात उतरले आहेत, अशा मंडळींकडूनच जेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या लोकांना त्रास होतो तेव्हा ‘ही डोकेदुखी आता अशीच वाढणार’ असे शब्द मतदारराजाच्या तोंडातून बाहेर पडल्यास आश्चर्य वाटू नये. असाच काहीसा अनुभव काही दिवसांपासून मेनरोड परिसरात येत आहे.  निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले व त्यांची छाननीही पार पडली. अजून नागरिकांचा कौलही मिळालेला नाही आणि लोकप्रतिनिधीचा शिक्काही बसलेला नाही; मात्र तरीही केवळ उमेदवारी मिळाल्याच्या बळावरच जेव्हा काही राजकीय कार्यकर्ते वेगळ्याच आविर्भावात वावरतात तेव्हा मतदारराजाची वाट ‘बिकट’ होते. मेनरोड ही शहराची मुख्य बाजारपेठ. त्यामुळे या भागात शहरातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असणे स्वभाविक आहे. मेनरोड, दहीपूल, राजेबहाद्दर लेन, धुमाळ पॉइंट, सरस्वती लेन, भद्रकाली परिसरात नागरिक आपल्या वैयक्तिक कामासाठी आलेले असताना पूर्व प्रभागाच्या कार्यालयात सुरू असलेल्या निवडणुकीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेच्या धामधुमीत बहुतांश उमेदवार व इच्छुकांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क नागरिकांसोबतच अरेरावी केली. वाहनांचा अडथळा, वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मागील चार दिवसांपासून मेनरोड, दहीपूल भागांतून मतदारराजाच्या नाकीनव येत आहे. यावेळी काही कार्यकर्ते किंवा उमेदवारांकडून मतदारराजावर डोळे ताणणे किंवा वाहनाला चुकून हलकासा धक्का जरी लागला तरी जणू सत्तेची गुर्मी चढते अशा आविर्भावात खडे बोल सुनावण्याचेही प्रकार या भागात घडल्याचे काही नागरिकांनी याचि देहि याचि डोळा बघितले.  ज्या लोकांच्या बळावर निवडणुकीत सत्ता मिळवायची आहे त्याच लोकांना कळत-नकळत त्रास होत असल्याची तसूभरही जाणीव पूर्व विभागात गर्दी करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना नव्हती. त्यामुळे मतदारराजाची वाट मेनरोड, दहीपूल भागांतून बिकट झाली होती. महिलावर्गाने तर संतापून डोक्यावर हात मारत ‘हा काय ताण झालाय’ असे म्हणून नाराजी व्यक्त केली. एकूणच उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मतदारराजाचा ही नाराजी धोक्याची ठरू शकते.