शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चाललो प्रकाशात..

By admin | Updated: January 2, 2016 23:18 IST

मनमाड : शहरातील विविध चर्चमध्ये मध्यरात्रीची भक्ती

मनमाड : शहरात नाताळचा सण उत्साहात सुरू असून, गुरुवारी रात्री शहरातील विविध चर्चमध्ये नूतन वर्ष भक्ती संदेशासह गीता कार्यक्रमांतर्गत आयोजित मध्यरात्रीच्या भक्तीमध्ये असंख्य ख्रिस्ती बांधवांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आम्ही चाललो प्रकाशात..प्रकाशात... गीताच्या तालावर नवीन वर्षाचे स्वागत केले. सरत्या वर्षातील दुष्कृत्यांचा नाश करण्याच्या हेतूने शेकोटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नाताळ सणानिमित्त शहरातील विविध चर्च परिसरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री संत बार्णबा चर्च, बेथेल चर्च, सेव्हथ-डे अ‍ॅडव्होटिस्ट चर्च आदि विविध चर्चमध्ये ‘मध्यरात्रीची भक्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास कॅँडल कार्यक्रमात बांधवांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत केले. या वेळी सर्वांनी ‘आम्ही चाललो प्रकाशात’ या गीताचे सामूहिक गायन केले. चर्चच्या आवारात पेटविण्यात आलेल्या शेकोट्या भोवती भक्तिगीतांचे गायन करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले होते. ख्रिश्चन बांधव, आबाल वृद्ध, माहिला मोठ्या संख्येने नवे कपडे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्व बांधवांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कॅम्प भागात दरवर्षीप्रमाणे भव्य स्टार उभारण्यात आला आहे. नाताळ व नवर्षानिमित्त बार्णबा चर्चच्या वतीने पूर्वसंध्या बप्तीसे, निराधार विधवांना साडी वाटप, संदेश भक्ती, पवित्र सहभागीता, कॅण्डल सर्विस आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रेव्ह. आर. पी. घुले यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पाटोळे, शॅमुवेल कुबेरजी,अतुल सूर्यवंशी, पोस्टेरेट कमिटी सचिव दिलीप सूर्यवंशी, स्मिता अडांगळे, प्रवीण निकम आदि सदस्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)