शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: September 5, 2015 21:38 IST

मालेगाव : लोकप्रतिनिधी-प्रशासनाचा शिक्कामोर्तब

आझादनगर : मालेगाव शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील कमी झालेला पाणीसाठा आणि पावसाने फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर शहरास शनिवारपासून एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पाणीटंचाईसंदर्भात मनपा महासभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम होते. शहरास चणकापूर धरणातून तळवाडे साठवण तलावाद्वारे तसेच गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र चणकापूर धरणक्षेत्रात यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. तळवाडे साठवण तलावातील पाणीसाठाही कमी झालेला आहे. मालेगाव-शहर - तालुक्यासह जळगाव जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा आता तीन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी गेल्या गुरुवारी मनपा गटनेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. त्यानंतर महापौर हाजी मोहंमद, उपमहापौर हाजी युनूस ईसा व मनपा आयुक्त बोर्डे यांनी संयुक्तरीत्या गिरणा धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केल्यानंतर तातडीने शनिवारी पाणीपुरवठा आढावा बैठक बोलावली. या बैठकीत शहराच्या पाणीटंचाईसंदर्भात विशेष महासभा बोलावण्याची मागणी पुढे आली. मात्र मालेगाव विकास आघाडीचे गटनेते सुनील गायकवाड यांनी सध्याची पाणीटंचाई ‘न भूतो’ अशी असल्यामुळे त्याविषयी आजच निर्णय घेण्याची मागणी केली. तिसरा महाजचे नेते एजाज उमर यांनी विशेष महासभेचा कोरम पूर्ण न झाल्यास विषय पुन्हा लांबणीवर पडण्याची आशंका व्यक्त केली. तसेच सध्याचे शहराचे पाणी आरक्षण हे १९७१च्या लोकसंख्येनुसार आहे. आज शहराच्या लोकसंख्येत तीनपट वाढ झाली आहे. शिवाय हद्दवाढ झाल्यामुळे पाणीआरक्षणात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर उपमहापौर युनूस ईसा यांनी यासंदर्भात मनपातर्फे ठराव करून राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच त्यासाठी येत्या ११ सप्टेंबरच्या महासभेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. सदर बैठकीस प्रा. रिजवान खान, शिवसेनेचे गटनेते मनोहर बच्छाव, सखाराम घोडके, मोहंमद आमीन, रफीक शेख, एजाज बेग आदि नगरसेवक व मनपा अधिकारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)