शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दोन वेळेस पाणीपुरवठा?

By admin | Updated: August 15, 2014 00:38 IST

पुन्हा दोन वेळेस पाणीपुरवठा?

नाशिक : शहरातील पाणीकपात रद्द केल्यानंतरही चार विभागांत एकवेळ निर्णय पालिका मागे घेणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात महापौर आणि आयुक्त यांच्यात गुरुवारी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.यंदा पावसाने ओढ दिल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेने ७ जुलैपासून पाणीकपात जाहीर केली. सिडको व सातपूर विभागात एकवेळ पाणीपुरवठा होत असल्याने पूर्व आणि नाशिक पश्चिम तसेच पंचवटी आणि नाशिकरोड विभागात दोनऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातच पाणीकपात करून सुमारे १५ टक्के बचत करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या ५ आॅगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली असली, तरी चारही विभागांत एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु त्यासंदर्भात आता तक्रारी वाढु लागल्या आहेत. नाशिकरोड विभागात तर जलकुंभांची पुरेशी क्षमता नसल्याने दोन टप्प्यांत पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने पुन्हा दोनवेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असून, भाजपाचे गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी त्यासंदर्भात महापौरांकडे विनंती केली आहे. त्यामुळे महापौर अ‍ॅड. वाघ हे गुरुवारी आयुक्तांशी चर्चा करणार असून, त्यानंतर शहराच्या चारही भागांत पुन्हा दोनवेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)