नाशिक : एप्रिल सुरू होताच जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली असून, एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात काल (दि.९) अखेर ३८ गावे व १०७ वाड्या मिळून एकूण १४५ गाव-वाड्यांना २१ शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे कंसात टॅँकरची संख्या- बागलाण- १ गाव (१), चांदवड-२ (१), दिंडोरी-० (०), देवळा- २ गावे- ५ वाड्या एकूण ७ (१), इगतपुरी- ० (०), मालेगाव-० (०), नांदगाव- ८ गावे- ३९ वाड्या एकूण-४७ (२), नाशिक- ० (०), निफाड- ० (०), पेठ-० (०), सुरगाणा-० (०) २, सिन्नर- ६ गावे- ५८ वाड्या एकूण-६४ (११), त्र्यंबकेश्वर-० (०), येवला- १९ गावे -५ वाड्या एकूण-२४ (५) असा एकूण ३८ गावे व १०७ वाड्या मिळून एकूण १४५ गाव-वाड्यांना २१ शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
दीडशे गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST