शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात जलपुरवठा योजना

By admin | Updated: December 20, 2015 00:29 IST

शुभारंभ : सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

नाशिक : फेसबुकवरील तरुणांनी स्थापन केलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या वर्धापनदिनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या दुष्काळी गावात पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. योजनेचा शुभारंभ वर्षानुवर्षांपासून डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवकाबाई बोरसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. अडीच हजार लोकवस्तीच्या तोरंगण गावात उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्याची दखल सोशल नेटवर्किंग फोरमने घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर काम सुरू केले होते. त्यानुसार जलपुरवठा योजना राबविली जाणार असून, दोन किलोमीटरवरील नदीतील पाणी पाइपलाइनद्वारे गावात आणून अत्याधुनिक शुद्धीकरण यंत्रणेच्या सहाय्याने ते पिण्यायोग्य बनविले जाणार आहे. या योजनेद्वारे गावात बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. या कार्यात गावातील तरुण श्रमदान करणार आहेत, तर ग्रामपंचायतीनेही काही आर्थिक भार उचलला आहे. अन्य निधी फेसबुकवरील तरुण नेटिझन्सनी आपल्या पॉकेट मनीतून तसेच डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षक अशा लोकांनी उभारला आहे. दरम्यान, योजनेचा शुभारंभ गावातील कोरड्या पडलेल्या विहिरीचे पूजन करून झाला. शुभारंभप्रसंगी सोशल फोरमचे सदस्य व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, सौ. जया सोनवणे, प्रमोद गायकवाड, डॉ. उत्तम फरताळे, डॉ. पंकज भदाणे, डॉ. प्रशांत देवरे, प्रशांत बच्छाव, महेश मुठा, डॉ. मंगेश चव्हाण, रामदास बोरसे, रामनाथ बोरसे, अंबादास बोरसे, देवराम पेंढार, भगवान बोरसे आदि उपस्थित होते.