शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

पाणीपुरवठ्याचे मोजमाप

By admin | Updated: January 2, 2016 23:42 IST

सोशल आॅडिट : वितरण व्यवस्थेतील असमतोल उघड, जनतेचेही प्रबोधन

नाशिक : महापालिकेने पाणीपुरवठ्यातील वितरण व्यवस्थेच्या सोशल आॅडिटला शनिवारी पहाटेपासून सुरुवात केली. शहरातील ९४ जलकुंभांसह सहा जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणीपुरवठ्याचे मोजमाप करताना वितरण व्यवस्थेतील असमतोलाचे दर्शन तर घडलेच शिवाय सिडको परिसरात पाण्याचा अपव्ययही होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन पाणीबचतीसंबंधी जनतेच्याही प्रबोधनाची भूमिका निभावली. सदर आॅडिटच्या माध्यमातून निघणाऱ्या निष्कर्षातून समन्यायी पद्धतीने पाणीवाटपासंबंधी नियोजन केले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा आणि सुरू असलेली पाणीकपात याचा मेळ घालत जुलै २०१६ अखेरपर्यंत पाणीनियोजन करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे चोवीस तासांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शनिवारी पहाटे ५ वाजता शहरातील सर्व ९४ जलकुंभ आणि ६ जलशुद्धीकरण केंद्रांवर त्याची सुरुवात करण्यात आली. महापालिकेचे २० अभियंते आणि संदीप फाउंडेशन, शासकीय तंत्रनिकेतन आणि मविप्र संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सुमारे १८५ विद्यार्थ्यांनी जलकुंभामधील पाणीपुरवठ्याचे मोजमाप केले. त्यात प्रामुख्याने, गंगापूर व दारणा धरणातून २४ तासांत किती पाण्याची उचल होते, तेथून सहा जलशुद्धीकरण केंद्रांवर किती पाणी पोहोचते आणि किती पाणी पुढे वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जलकुंभाद्वारे पाठविले जाते, जलकुंभ किती वेळात भरला जातो आणि किती वेळात खाली होतो, जलकुंभापासून घरोघरी किती मिनिटांत पाणी जाऊन पोहोचते आणि किती प्रमाणात पाणी मिळते, या साऱ्या प्रश्नांची पडताळणी करण्यात आली. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र परिसरात सहा जलकुंभ आहेत. तेथील पाणीपुरवठ्याचे मोजमाप स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर सिडको, सातपूर परिसरातील जलकुंभांद्वारे होणाऱ्या वितरण व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. जलकुंभाला जो भाग जोडण्यात आला आहे, तेथील परिसरातील घरोघरी जाऊन पाणी वितरणाची माहिती संकलित करण्यात आली. पाण्याच्या मीटर्सची तपासणी करण्याबरोबरच जेथे मीटर नाहीत त्याठिकाणी एक बादली किती वेळात भरते, याचे मोजमाप करण्यात येऊन नोंदी घेण्यात आल्या. याचवेळी सिडकोतील पवननगर, सावतानगर परिसरात रस्त्यावरून पाणी वाहून जात असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी पाणीबचतीसंबंधी जनतेचे प्रबोधनही केले. याचदरम्यान, आयुक्तांनीही काही परिसरात प्रत्यक्ष भेटी घेऊन पाणीवितरणातील व्यवस्थेची पाहणी केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, शिवाजी चव्हाणके यांनीही ज्या भागातून पाणीटंचाईच्या तक्रारी होत्या तेथे प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी केली. सदर सोशल आॅडिट रविवार, दि. ३ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत चालणार आहे. या आॅडिटदरम्यान परिसरातील नागरिकांकडून पाणीपुरवठ्यासंबंधी सूचना व तक्रारींबाबत विहित नमुन्यातील फॉर्मही भरून घेण्यात आले. (प्रतिनिधी)