शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई : ऐन उन्हाळ्यात रानोमाळ भटकंती

By admin | Updated: May 23, 2015 23:47 IST

बादलीभर पाण्यासाठी जीव टांगणीला

 तळवाडे दिगर - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जंगलात राहणाऱ्या पिसोरे येथील आदिवासी लहान मुलींना गावातील तळ गाठलेल्या विहिरीत धोकादायक स्थितीत चढउतार करून बादलीभर पाण्यासाठी जीव टांगणीला लावावा लागत आहे, तर दुसरीकडे विहिरीत उतरू न शकणाऱ्या गावातील महिलांना ऐन उन्हाळ्यामध्ये थेंब-थेंब पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे.गावातील पाणीपुरवठ्यासाठी सन १९८३मध्ये चार लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु गावात तशी पाणीपुरवठा यंत्रणा नाही की प्रत्यक्षात पाणीपुरवठा नाही. गावातच एक छोटेखानी विहिरी आहे. अवघ्या बारा ते पंधरा फूट खोली असलेल्या विहिरीमध्ये सध्या थोडेसेच परंतु अतिशय गलिच्छ पाणी आहे. परंतु टंचाई काळात तेही येथील ग्रामस्थांसाठी अमृता समान आहे. पाणी उपशाची थेट कुठलीही व्यवस्था नाही. पाण्यासाठी थेट विहिरीतच खाली उतरावे लागते. विहिरीच्या कडे - कपारीमध्ये हातांची बोट रुतवत विहिरीमध्ये चढता-उतरताना लहान-लहान मुलामुलींचा अक्षरश: जीव टांगणीला लागतो. गावातील पाण्यासाठी दुसरे पर्यायी ठिकाण म्हणजे गावापासून अर्ध्या किलोमीटरवर असलेला विनापाण्याचा धरणाचा पायथा. याठिकाणी गाळ मातीमध्ये महिलांनी ठिकठिकाणी खड्डे खोदून पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे. या खड्ड्यांमधून ताटली वाटीने पाणी उपसून - खरडून एक एक हंडाभर पाण्यासाठी एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागते. एक हंडा पाण्यासाठी दिवसभर महिलांना ‘नंबर’वर उभे रहावे लागते. रात्रीच्या वेळी धरणालगतच्या झाडींमध्ये मध्ये जंगली जनावरांच्या भीतीने ४० ते ५० पुरुष पाण्यासाठी रात्रभर जागे राहतात. येथील स्त्री - पुरुष, तसेच मुलामुलींचा दिवस आणि रात्रीचा वेळ पाण्यासाठी जात आहे. अशा परिस्थितीत शंभर टक्के मोलमजुरी करणाऱ्या संपूर्ण गावातील आदिवासींना उदरनिर्वाहाची चिंता भेडसावू लागली आहे. पिण्याचेच पाणी जेथे महत्प्रयासाने मिळते तेथे आंघोळीसह इतर विधीक्रियांसाठी पाणी म्हणजे मौजच. आठ-आठ दिवस आंघोळीसह इतर गोष्टींसाठी पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.